असात्त्विक रांगोळीतून वातावरणात पुष्कळ नकारात्मक स्पंदने, तर सात्त्विक रांगोळीतून पुष्कळ सकारात्मक स्पंदने प्रक्षेपित होणे

‘रांगोळी ही ६४ कलांपैकी एक आहे. सणा-समारंभात घरोघरी रांगोळी काढली जाते. सौंदर्याचा साक्षात्कार आणि मांगल्याची सिद्धी हे रांगोळीचे दोन उद्देश आहेत. जेथे सात्त्विक रांगोळी काढली जाते, तेथे आपोआपच मंगलदायी वातावरणाची निर्मिती होते.

कोरोना महामारीच्या संदर्भात अग्निहोत्राच्या विभूतीचे लक्षात आलेले महत्त्व !

‘दोन वर्षांपूर्वी चेन्नई येथील भृगु जीवनाडीपट्टीचे वाचन करणारे श्री. सेल्वम्गुरुजी यांच्या माध्यमातून भृगु महर्षींनी श्रीचित्‌‌शक्ति (सौ.) अंजली गाडगीळ यांना अग्निहोत्र करायला सांगितले होते. श्रीचित्‌‌शक्ति (सौ.) अंजली गाडगीळ दैवी प्रवासात असतांना जेव्हा जेव्हा त्यांना शक्य होते, तेव्हा अग्निहोत्र करतात.