भूमापन अधिकारी कार्यालयातील प्रमुख लिपिकाला लाच स्वीकारतांना रंगेहात पकडले !

सातारा, २७ ऑगस्ट (वार्ता.) – येथील भूमापन कार्यालयातील एका कामासाठी ५ सहस्र रुपयांची लाच स्वीकारतांना प्रमुख लिपिक शामराव बांदल यांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने रंगेहात पकडले. (अशा लाचखोरांची सर्व संपत्ती जप्त करून त्यांना कठोर शिक्षा केल्यासच इतरांवर जरब बसेल ! – संपादक)

भूमापन कार्यालयातील एका कामाचे नोंद प्रकरण घेऊन ते संमत करून देण्यासाठी भूमापन कार्यालयातील प्रमुख लिपिक बांदल यांनी तक्रारदाराकडे ५ सहस्र रुपयांची लाच मागितली होती. तक्रारदारांनी याविषयी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केली. याविषयी पडताळणी केल्यानंतर त्यामध्ये तथ्य आढळून आले. तेव्हा लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने सापळा रचून बांदल यांना लाच स्वीकारतांना रंगेहात पकडले. याविषयी सातारा शहर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्याचे काम रात्री उशिरापर्यंत चालू होते.

संपादकीय भूमिका

सरकारी विभागातील भ्रष्टाचाराच्या घटना देशाच्या विकासामध्ये अडथळा असून तो दूर होणे आवश्यक !