लोकशाहीने चाललेल्या भारताचा विनाश करणे, हे डाव्यांचे कारस्थान ! – माधव भांडारी, ज्येष्ठ विचारवंत आणि भाजप नेते

पुणे येथे ज्येष्ठ विचारवंत आणि भाजप नेते श्री. माधव भांडारीलिखित ‘डाव्यांचा खरा चेहरा’ या पुस्तकाचा प्रकाशन सोहळा

७५ वर्षांवरील ज्येष्ठ नागरिकांना एस्.टी.च्या सर्व बसगाड्यांमधून प्रवास विनामूल्य !

राज्यातील ७५ वर्षांवरील ज्येष्ठ नागरिकांना एस्.टी.च्या बसमधून विनामूल्य प्रवास योजना चालू करण्याचा निर्णय राज्यशासनाने घेतला आहे. या योजनेचा अनुमाने १५ लाख ज्येष्ठ नागरिकांना लाभ होणार आहे.

नियमांचे उल्लंघन करणार्‍या गणेशोत्सव मंडळांवर कारवाई करू ! – माधव जगताप, पुणे महापालिका

शहरामध्ये श्री गणेशमूर्ती विक्रीची ठिकाणे महापालिकेने निश्चित केली आहेत. त्यानुसार मूर्तीकार, उत्पादक आदींना एकत्रितपणे मूर्ती विक्रीची दुकाने थाटावी लागणार आहेत. संबंधित विक्रेत्यांनी महापालिकेकडून रितसर अनुमती घ्यावी.

तळोजा येथे अमली पदार्थाची विक्री करणार्‍या नायजेरियन व्यक्तीला अटक

तळोजा येथे अमली पदार्थाची विक्री करणार्‍या नायजेरियन व्यक्तीला पोलिसांनी अटक केली आहे. अँथोनी नैईमेका ओकोली असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव असून तो खारघरमध्ये रहातो.

मुंबई-पुणे द्रुतगती महामार्गावर एक दिवसाची पथकर माफी !

मुंबई-पुणे द्रुतगती महामार्गावर दुरुस्तीचे काम चालू असल्याने वाहतुकीची कोंडी होऊ नये; म्हणून २७ ऑगस्ट या दिवशी या महामार्गावरून जाणार्‍या वाहनांसाठी राज्य सरकारने १ दिवसासाठी पथकर माफ केला होता.

३३ टक्क्यांहून अधिक पीकहानी झालेल्या शेतकर्‍यांना भरपाई !

बीड, लातूर, धाराशिव या जिल्ह्यांसह राज्यात अन्य काही भागांतील १ लाख ६३ सहस्र ८८९ हेक्टर क्षेत्र गोगलगायींनी बाधित झाल्याचे निष्पन्न झाले आहे.

देशवासियांमध्ये जागृती !

‘आपण काहीही दाखवले, तरी भारतीय जनता आपल्याला डोक्यावर घेतेच’, हा समज आता बॉलिवूडने दूर केला पाहिजे. भारतियांमध्ये राष्ट्र आणि धर्म प्रेम आता जागृत होत आहे. हा भारत आणि हिंदु धर्म यांसाठी नक्कीच आशेचा किरण आहे !

नाशिक येथील लाचखोर जी.एस्.टी. (वस्तू आणि सेवा कर) अधिकार्‍यास ३० ऑगस्टपर्यंत पोलीस कोठडी !

अटक केल्यानंतर चव्हाणके यांच्या घरीही झडती घेण्यात आली असून यामध्ये लाखो रुपयांची रोकड, मालमत्तेची कागदपत्रे सीबीआय पथकाने जप्त केली आहेत.

श्री महालक्ष्मी मंदिरात साहित्य ने-आण करण्यासाठी बॅटरीवर चालणारे वाहन अर्पण !

श्री महालक्ष्मी मंदिरातून साहित्य बाहेर नेणे, तसेच लाडू-प्रसाद आणि अन्य साहित्य मंदिरातून आत-बाहेर करण्यासाठी दोन वाहनांची आवश्यकता होती. ही वाहने बेंगळुरू येथील भाविक मेकिपत्ती राजगोपाल रेड्डी यांनी अर्पण करण्याचा निर्णय घेतला आहे.

श्री गणेशमूर्ती विसर्जन पंचगंगा नदीच्या वहात्या पाण्यात करण्यास आडकाठी आणू नये ! – समस्त हिंदुत्वनिष्ठ संघटनांचे जिल्हाधिकारी यांना निवेदन

ज्यांना श्री गणेशमूर्ती विसर्जन पंचगंगेत करायचे आहे त्यांना आडकाठी आणू नये. कुणावरही कुठे विसर्जन करावे, यासाठी सक्ती करू नये, असे निवेदन कोल्हापूर येथील समस्त हिंदुत्वनिष्ठ संघटना यांच्या वतीने जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांना देण्यात आले.