बंगालमधील सत्ताधारी पक्षाने हिंदु धर्माचा अवमान थांबवावा ! – बंगाल साधू समाजाची चेतावणी

साधूंना अशी मागणी करावी लागणे ममता बॅनर्जी सरकारला लज्जास्पद ! हिंदु धर्म आणि राष्ट्र यांवरील आघात रोखू न शकणारे मममा बॅनजी सरकार केंद्र सरकारने बरखास्त करावे, अशी हिंदूंची मागणी आहे !

रामनगर (कर्नाटक) येथून ७ बांगलादेशी घुसखोरांना अटक !

बांगलादेशी घुसखोरांच्या समस्येचे गांभीर्य जाणून त्यांचा बंदोबस्त करण्यासाठी भारत सरकारने कायद्यांची कठोर कार्यवाही करणे अपेक्षित !

सच्चिदानंद परब्रह्म डॉ. जयंत आठवले यांचे तेजस्वी विचार

‘एका अब्जाधिशाच्या मुलाने त्याची सर्व संपत्ती उधळून टाकावी, तशी हिंदूंच्या मागच्या पिढ्यांनी सर्व धर्मसंपत्ती मातीमोल केली आहे !’ –  सच्चिदानंद परब्रह्म डॉ. जयंत आठवले   

लक्ष्मणपुरी (उत्तरप्रदेश) येथील लुलू मॉलमधील नमाजपठणास हिंदूंचा तीव्र विरोध !

मॉलच्या व्यवस्थापनाकडून ८० टक्के कर्मचार्‍यांमध्ये केवळ मुसलमान पुरुष, तर उर्वरित कर्मचार्‍यांमध्ये केवळ हिंदु स्त्रिया नेमल्याचा आरोप !

राष्ट्रपतीपदाच्या उमेदवार द्रौपदी मुर्मू यांनी साधला युतीच्या खासदार आणि आमदार यांच्याशी संवाद !

राष्ट्रीय लोकशाही आघाडीच्या उमेदवार द्रौपदी मुर्मू यांनी १४ जुलै या दिवशी मुंबईमध्ये भाजप आणि शिवसेना यांचे खासदार अन् आमदार यांच्याशी संवाद साधला. १८ जुलै या दिवशी होणार्‍या राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीच्या प्रचारासाठी मुर्मू मुंबई येथे आल्या होत्या.

लोकसंख्या वाढवण्याचे काम जनावरेही करतात, माणसाची इतरही अनेक कर्तव्ये आहेत ! – सरसंघचालक

लोकसंख्या वाढवण्याचे काम जनावरेही करतात. केवळ जिवंत रहाणे, हाच जीवनाचा उद्देश नसावा. माणसाची इतरही अनेक कर्तव्ये आहेत, असे विधान राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक डॉ. मोहन भागवत यांनी केले.

माजी उपराष्ट्रपती हमीद अन्सारी यांच्या कारकीर्दीचे अन्वेषण करा !

वर्ष २००७ ते २०१७ या काळात उपराष्ट्रपतीपद भूषवणार्‍या ‘हमीद अन्सारी यांच्या निमंत्रणावरून भारतात पत्रकार म्हणून दौरे करतांना भारतातील महत्त्वाची गोपनीय माहिती हमीद अन्सारी यांच्याकडून मिळवली’, असा गौप्यस्फोट नुसरत मिर्झा या पाकिस्तानी पत्रकाराने केला आहे.

महाराष्ट्रात पेट्रोल ५ रुपयांनी, तर डिझेल ३ रुपयांनी स्वस्त होणार !

राज्यात पेट्रालचे दर प्रतिलिटर ५ रुपयांनी, तर डिझेलचे दर प्रतिलिटर ३ रुपयांनी न्यून करण्याचा निर्णय मंत्रीमंडळाच्या बैठकीत घेण्यात आला. रात्री १२ पासून हा निर्णय लागू झाला आहे. यामुळे राज्याच्या तिजोरीवर ६ सहस्र कोटी रुपयांचा भार पडेल, अशी माहिती मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली.

कोल्हापूर येथील पंचगंगा नदीच्या पाण्याची इशारा पातळीकडे वाटचाल !

गेल्या काही दिवसांपासून चालू असलेल्या पावसामुळे पंचगंगा नदीच्या पाण्याची वाटचाल इशारा पातळीकडे (३९ फूट) चालू आहे. १४ जुलै या दिवशी दुपारी १ वाजता ही पातळी ३७ फूट २ इंचावर पोचली.

नगर परिषद आणि नगर पंचायत निवडणुकीला राज्य निवडणूक आयोगाकडून स्थगिती !

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीमध्ये इतर मागासवर्गीय समाजाला द्यावयाच्या आरक्षणाविषयी सर्वाेच्च न्यायालयात चालू असलेल्या सुनावणीमुळे राज्यातील नगर परिषदा आणि नगर पंचायत यांच्या निवडणुकीला राज्य निवडणूक आयोगाने स्थगिती दिली आहे.