लोकसंख्या वाढवण्याचे काम जनावरेही करतात, माणसाची इतरही अनेक कर्तव्ये आहेत ! – सरसंघचालक

चिकबळ्ळापूरा (कर्नाटक) – लोकसंख्या वाढवण्याचे काम जनावरेही करतात. केवळ जिवंत रहाणे, हाच जीवनाचा उद्देश नसावा. माणसाची इतरही अनेक कर्तव्ये आहेत, असे विधान राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक डॉ. मोहन भागवत यांनी केले. ते कर्नाटकातील चिकबळ्ळापूरा जिल्ह्यातील मुद्देनहळ्ळीमध्ये सत्य साईं ग्राम येथे ‘श्री सत्य साई युनिव्हर्सिटी फॉर ह्यूमन एक्सिलन्स’च्या पहिल्या दीक्षांत समारंभात बोलत होते. जर माणसाकडे बुद्धी नसती, तर तो पृथ्वीवरील सर्वांत कमकुवत प्राणी बनला असता, असेही त्यांनी सांगितले.

डॉ. भागवत पुढे म्हणाले की, जर १०-१२ वर्षांपूर्वी कुणी म्हणाले असते की, ‘भारत मोठी प्रगती करेल’, तर आपण ते गांभीर्याने घेतले नसते. राष्ट्राची प्रक्रिया एकाएकी चालू  झालेली नाही, ती वर्ष १८५७ पासून चालू आहे, जी स्वामी विवेकानंद यांनी पुढे नेली. आध्यात्मिक साधनांच्या माध्यमांद्वारे उत्कृष्टता प्राप्त केली जाऊ शकते; कारण विज्ञानाला अद्याप सृष्टीचा उगम समजलेला नाही.