रामनगर (कर्नाटक) येथून ७ बांगलादेशी घुसखोरांना अटक !

बेंगळुरू (कर्नाटक) – राज्यातील रामनगर जिल्ह्यातून पोलिसांनी ७ बांगलादेशी घुसखोरांना अटक केली. त्यांच्याकडून बनावट ओळखपत्र जप्त करण्यात आले आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार हे घुसखोर येथील कपड्याच्या एका कारखान्यात काम करत होते. त्यांना एका दलालामार्फत येथे आणण्यात आले असून पोलीस त्या दलालाचा शोध घेत आहेत. या सातही जणांकडून बांगलादेशी नागरिक असल्याचे ओळखपत्रही मिळाले आहे. हे घुसखोर खरेच नोकरी करण्याच्या निमित्ताने येथे आले होते कि कोणत्या षड्यंत्राच्या अंतर्गत ते काम करत होते?, याचे अन्वेषणही करण्यात येत आहे.

काही दिवसांपूर्वीच राज्याचे गृहमंत्री अरगा ज्ञानेंद्र यांनी ‘राज्यात अनधिकृतरित्या आलेल्या विदेशी नागरिकांवर कठोर कारवाई करण्यात येईल’, असे सुतोवाच केले होते.

संपादकीय भूमिका

बांगलादेशी घुसखोरांच्या समस्येचे गांभीर्य जाणून त्यांचा बंदोबस्त करण्यासाठी भारत सरकारने कायद्यांची कठोर कार्यवाही करणे अपेक्षित !