पंजाब विधानसभेत ‘अग्नीपथ’ योजनेच्या विरोधात ठराव संमत !

तरुणांना सैन्यात भरती होण्याची संधी देणार्‍या केंद्र सरकारच्या अग्नीपथ या योजनेविरोधात पंजाब विधानसभेत ३० जून या दिवशी ठराव संमत करण्यात आला. भाजपचे आमदार अश्‍वनी शर्मा आणि जंगीलाल महाजन यांनी या ठरावाच्या विरोधात मतदान केले.

पाकिस्तानने शिक्षा भोगलेल्या ५३६ भारतीय मासेमारांची सुटका करावी ! –  भारत

पाकिस्तानने अटक केलेल्या ५३६ भारतीय मासेमार आणि अन्य ३ बंदीवान यांची सुटका करण्याची मागणी भारताने केली आहे. या बंदीवानांनी त्यांची शिक्षा पूर्ण केली आहे.

भारतीय न्यायव्यवस्थेसाठी काळा दिवस ! – आनंद रंगनाथन्

आजचा दिवस हा भारतीय न्यायव्यवस्थेसाठी काळा दिवस आहे. या देशात आता न्यायाची आशा नाही. कसलीही आशा शिल्लक राहिलेली नाही. नूपुर शर्मा यांची येणार्‍या काळात रक्ताला तहानलेल्या जिहाद्यांकडून हत्या होऊ शकते.

गोमंतकियांच्या रक्षणासाठी कट्टरपंथी आणि घुसखोर यांच्यावर त्वरित कारवाई करावी ! – हिंदु रक्षा महाआघाडी

गोमंतकातील शांत आणि संयमी नागरिकांना उद्या कन्हैयालालप्रमाणे एखाद्या क्रूर घटनेला सामोरे जावे लागू नये, यासाठी गोव्यातील सरकारने या संदर्भात सुरक्षेच्या दृष्टीने पावले उचलणे आवश्यक आहे.

उदयपूर, राजस्थान येथील ‘कन्हैयालाल’ यांची हत्या करणार्‍यांना फाशीची शिक्षा द्या !

केंद्रशासनाने हिंदूच्या हत्यांमागे कोणते षड्यंत्र आहे, याचा छडा लावावा. केवळ हत्येतील दोषींचा शोध न घेता हत्या करणार्‍यांना पैसा पुरवणारे, त्यांना आश्रय आणि प्रशिक्षण देणारे या सर्वांची चौकशी करून त्यांची पाळेमुळे खणून काढावीत.

धर्मकार्यार्थ ईश्‍वराचा आशीर्वाद कसा प्राप्त कराल ?

‘ईश्‍वराच्या प्राप्तीसाठी आपण धडपड केली, तर ईश्‍वराचे लक्ष आपल्याकडे वेधले जाते आणि आपण करत असलेल्या धर्मकार्यासाठी ईश्‍वराची कृपा अन् आशीर्वाद प्राप्त होतात.’ – (परात्पर गुरु) डॉ. आठवले

आपत्काळात भक्तीच तारणहार !

ईश्वराप्रती परम प्रेम म्हणजे भक्ती ! मानवाचा सर्वश्रेष्ठ धर्म म्हणजे भगवान श्रीकृष्णाप्रती असणारी भक्ती !

जिहादी कट्टरतेविरोधात कोल्हापूर येथे बजरंग दल अन् हिंदु संघटना यांच्या वतीने आतंकवादाच्या पुतळ्याचे दहन !

राजस्थानच्या उदयपूरमध्ये कन्हैयालाल यांची आतंकवाद्यांनी दुकानात घुसून निर्घृण हत्या केली. या हत्येनंतर इस्लामिक जिहादी आतंकवाद्यांनी धमकीचा ‘व्हिडिओ’ सर्वत्र पसरवून भारताच्या एकात्मतेला आव्हानच दिले.

विधानसभेच्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीसाठी विशेष अधिवेशन !

विधानसभा अध्यक्षपदाच्या निवडीसाठी ३ आणि ४ जुलै या दिवशी विशेष अधिवेशन बोलावले आहे. ३ जुलै या दिवशी अध्यक्षपदाची निवडणूक होईल.

हत्या करणाऱ्या आरोपींना कठोरातील कठोर शिक्षा व्हावी ! – श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचे निवेदन

राजस्थान येथे कन्हैयालाल तेली यांची जिहादी धर्मांधांनी निर्घृण हत्या केली. धर्मांधांकडून कायदा हातात घेऊन असे कृत्य होणे, हे धक्कादायक आहे. या संदर्भात कन्हैयालाल यांनी तक्रार केली होती; मात्र त्याकडे दुर्लक्ष करण्यात आले.