विधानसभेच्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीसाठी विशेष अधिवेशन !

विधानसभा

मुंबई, १ जुलै (वार्ता.) – विधानसभा अध्यक्षपदाच्या निवडीसाठी ३ आणि ४ जुलै या दिवशी विशेष अधिवेशन बोलावले आहे. ३ जुलै या दिवशी अध्यक्षपदाची निवडणूक होईल. नवनियुक्त भाजप आणि एकनाथ शिंदे यांच्या गटाकडे बहुमत होईल इतके संख्याबळ आहे. त्यामुळे अध्यक्षपद भाजपला मिळेल, अशी शक्यता वर्तवली जात आहे.