जिहादी कट्टरतेविरोधात कोल्हापूर येथे बजरंग दल अन् हिंदु संघटना यांच्या वतीने आतंकवादाच्या पुतळ्याचे दहन !

कोल्हापूर येथे जिहादी कट्टरता आणि आतंकवाद यांच्या प्रतिकात्मक पुतळ्याचे दहन करतांना बजरंग दल आणि हिंदुत्वनिष्ठ संघटना यांचे कार्यकर्ते

कोल्हापूर, १ जुलै (वार्ता.) – राजस्थानच्या उदयपूरमध्ये दिवसाढवळ्या हिंदु व्यावसायिक कन्हैयालाल यांची महंमद गौस आणि रियाज अख्तरी या आतंकवाद्यांनी दुकानात घुसून निर्घृण हत्या केली. या हत्येनंतर इस्लामिक जिहादी आतंकवाद्यांनी धमकीचा ‘व्हिडिओ’ सर्वत्र पसरवून भारताच्या एकात्मतेला आव्हानच दिले. जिहादी कट्टरता आणि हिंसाचार यांच्या विरोधात छत्रपती शिवाजी महाराज पुतळा चौक येथे बजरंग दल अन् हिंदु संघटना यांच्या वतीने आतंकवादाच्या पुतळ्याचे दहन करण्यात आले.

या प्रसंगी विश्व हिंदु परिषद, श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान, ऋणमातृभूमी, धर्मवीर स्मारकप्रेमी, राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आदी हिंदु संघटनांनी जोरदार घोषणा देऊन तीव्र निषेध व्यक्त केला.

बेळगाव येथील चनम्मा सर्कल येथे हिंदु संघटनांच्या वतीने निदर्शने !

बेळगाव – हिंदु संघटनांच्या वतीने राणी चनम्मा सर्कल येथे निदर्शने करण्यात आली. यात विश्व हिंदु परिषद, बजरंग दल, श्रीराम सेना यांसह अन्य संघटना सहभागी झाल्या होत्या.