पाकिस्तानने शिक्षा भोगलेल्या ५३६ भारतीय मासेमारांची सुटका करावी ! –  भारत

नवी देहली – पाकिस्तानने अटक केलेल्या ५३६ भारतीय मासेमार आणि अन्य ३ बंदीवान यांची सुटका करण्याची मागणी भारताने केली आहे. या बंदीवानांनी त्यांची शिक्षा पूर्ण केली आहे. भारताच्या परराष्ट्र मंत्रालयाच्या म्हणण्यानुसार वर्ष २००८ मध्ये झालेल्या कराराच्या आधारे १०५ मासेमार आणि इतर २० बंदीवान यांना भारतीय राजदूताकडून तात्काळ साहाय्य उपलब्ध करून द्यावे.

पाकिस्तानच्या कह्यात ६८२ भारतीय नागरिक !

पाकिस्तानच्या कारागृहांत ६८२ भारतीय बंदीवान असून दुसरीकडे भारताच्या कह्यात ४६१ पाकिस्तानी बंदीवान आहेत. परदेशी उच्चायुक्तालयांतील समन्वयाच्या वर्ष २००८ च्या करारानुसार भारत आणि पाकिस्तान यांच्यातील परस्परांच्या कह्यात असलेल्या या देशांचे नागरिक आणि मासेमार यांच्या सूचीची देवाण-घेवाण होते.