सांगली, १ जुलै (वार्ता.) – राजस्थान येथे कन्हैयालाल तेली यांची जिहादी धर्मांधांनी निर्घृण हत्या केली. धर्मांधांकडून कायदा हातात घेऊन असे कृत्य होणे, हे धक्कादायक आहे. या संदर्भात कन्हैयालाल यांनी तक्रार केली होती; मात्र त्याकडे दुर्लक्ष करण्यात आले. ही एका व्यक्तीची हत्या नसून तो हिंदु धर्मावर केलेला आघात आहे. तरी यातील आरोपींचा खटला जलदगती न्यायालयात चालवून हत्या करणाऱ्या आरोपींना कठोरातील कठोर शिक्षा व्हावी, या मागणीचे निवेदन श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानच्या वतीने निवासी उपजिल्हाधिकारी मौसमी बर्डे यांना देण्यात आले. या वेळी सर्वश्री हणमंतराव पवार, अंकुश जाधव, सचिन पवार यांसह अन्य उपस्थित होते.
उदयपूर (राजस्थान) येथील घटनेच्या निषेधार्थ बजरंग दलाच्या वतीने आंदोलन !
ईश्वरपूर (जिल्हा सांगली), १ जुलै (वार्ता.) – उदयपूर येथील हिंदु व्यावसायिक कन्हैयालाल यांची दोन जिहाद्यांनी हत्या केली आहे. या घटनेच्या निषेधार्थ ३० जून या दिवशी बजरंग दलाचे तालुकाप्रमुख श्री. सचिन पाटील यांनी निषेध आंदोलन केले. या वेळी विविध मागण्यांचे निवेदन तहसीलदारांना देण्यात आले. या आंदोलनास वाळवा तालुका शिवसेना, श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान, ‘महाडिक युवाशक्ती’ आणि अन्य हिंदुत्वनिष्ठ संघटना यांनी पाठिंबा दिला होता. या प्रसंगी बजरंग दलाचे जिल्हाप्रमुख श्री. सचिन जंगम, श्री. ज्ञानेश्वर पाटील, श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचे श्री. गजानन पाटील, ‘महाडिक युवाशक्ती’चे श्री. सुजित थोरात, शिवसेना उपशहरप्रमुख राजू पठाण, सर्वश्री पार्थ शेटे, अनंत नाईक, शुभम पाटील, विलास नाईक, अतुल सूर्यवंशी आदी उपस्थित होते.