ईश्वराप्रती परम प्रेम म्हणजे भक्ती ! मानवाचा सर्वश्रेष्ठ धर्म म्हणजे भगवान श्रीकृष्णाप्रती असणारी भक्ती ! भक्तीने मन आनंदी आणि शांत रहाते. गोपींची श्रीकृष्ण भक्ती, हनुमानाची दास्यभक्ती, देवर्षि नारदांची निस्सीम भक्ती अशी भक्तीची अनेक उदाहरणे आहेत. हल्लीच्या काळात भक्तीच्या उदाहरणामध्ये सनातन संस्थेचे प्रेरणास्थान प.पू. भक्तराज महाराजांनी पंढरपूर येथे पांडुरंगाला पेढा भरवला आणि त्याने तो भक्षण केला. ही उदाहरणे भक्तीसाठी प्रेरणादायी आहेत. भक्ती ही भगवंतावर प्रेम करण्याची आणि त्याचे प्रेम अनुभवण्याची प्रक्रिया आहे. भगवंताशी अनुसंधानात रहाण्यासाठी भक्तीच आवश्यक ! भक्तीने हृदयात भगवंताचे तत्त्व जागृत करूया. आपत्काळात भक्तीच तारणहार !
या विशेषांकाच्या माध्यमातून भावभक्तीचे महत्त्व वाचकांच्या अंतरंगात पोचून सर्वांची भक्ती वाढू दे, हीच श्रीकृष्णाच्या चरणी प्रार्थना !