डोंबिवली येथे विकासकाला फसवणार्‍या भोंदूबाबाला अटक !

कोट्यवधी रुपयांचा पैशाचा पाऊस पडेल, या आमिषाला बळी पाडून डोंबिवली पूर्वेकडील चोळे गावातील बांधकाम व्यावसायिक सुरेंद्र पाटील यांची ५६ लाख रुपयांची रक्कम घेऊन भोंदूबाबासह ५ भामटे पसार झाले होते.

कोल्हापूर जिल्ह्यात पाऊस लांबल्याने पेरण्या खोळंबल्या !

यंदा १०४ टक्के पाऊस पडेल, असा अंदाज हवामान विभागाने दर्शवला होता, त्यामुळे शेतकर्‍यांनी खरिपासाठी जोरदार सिद्धता केली होती.

भोर (जिल्हा पुणे) येथे पशूवधगृहात नेत असलेल्या २ गायींना वाचवण्यात गोरक्षकाला यश !

गायी इंदापूरच्या पशूवधगृहात नेत असतांना सदर टेंपो गोरक्षक पवार यांनी पोलिसांच्या कह्यात दिला.

नागरिकांनी पिण्याचे पाणी उकळून प्यावे ! – अभिजित बापट, मुख्याधिकारी, सातारा नगरपालिका

कास आणि शहापूर येथून सातारावासियांना पिण्याच्या पाण्याचा पुरवठा केला जातो. पावसाचे प्रमाण पहाता पाणी गढूळ येण्याची शक्यता आहे. जलशुद्धीकरण केंद्रातून गढूळ पाणी शुद्ध करूनच पुरवले जाते; मात्र तरीही पाणी गढूळ आल्यास नागरिकांनी दक्षता म्हणून गढूळ पाणी उकळून प्यावे.

महाराष्ट्र सरकारचे उर्दूप्रेम जाणा !

महाराष्ट्र राज्य उर्दू साहित्य अकादमीच्या वार्षिक व्ययासाठी राज्य सरकारने वर्ष २०२२-२३ साठी १९ लाख ६० सहस्र रुपयांची तरतूद केली आहे.

भारताला बलवान बनवू पहाणारी अग्नीपथ योजना !

संधीसाधू काँग्रेसनेही या योजनेला विरोध चालू ठेवला. त्यांना ‘नॅशनल हेरॉल्ड घोटाळा’ प्रकरणाला विरोध करण्यासाठी हे आयते कोलीत सापडले आहे. झारखंड काँग्रेसचे धर्मांध आमदार इरफान अंसारी यांनी तर ‘देशात रक्तपात झाला, तरीही आम्ही अग्नीपथ योजना लागू करू देणार नाही’, असे म्हटले आहे.

हिंसक आंदोलनांमध्ये लहान मुलांचा वाढता सहभाग चिंताजनक !

दंगलीमध्ये लहान मुले समोर असल्याने पोलिसांना निदर्शकांवर बळाचा वापर करता येत नाही; कारण काही अपरिमित घडले की, हेच लोक संयुक्त राष्ट्रांपर्यंत गळे काढतात आणि भारताची आंतरराष्ट्रीय स्तरावर मानहानी करायला मोकळे असतात. त्यामुळे कायदा आणि सुव्यवस्था व्यवस्थित राखण्यासाठी या विषयाचा गांभीर्याने विचार करणे आवश्यक आहे.

हिंदु धर्माखेरीज अन्य कोणत्याही धर्माला इतक्या मोठ्या प्रमाणात कलंकित केले जात नाही ! – मारिया वर्थ, हिंदु धर्माच्या अभ्यासक आणि विचारवंत

हिंदु धर्म हा केवळ विश्वासावर नाही, तर ज्ञानावर आधारीत आहे. आमच्यासह जगाविषयी काय सत्य आहे, याचा खरोखरचा शोध या धर्मात घेतला आहे. ज्याला काही अर्थ नाही आणि ज्याची पडताळणी करता येत नाही, अशांवर विश्वास ठेवण्याची हिंदूंना आवश्यकता नाही. त्यांना पूर्ण स्वातंत्र्य आहे.