भोर (जिल्हा पुणे) – येथील कर्तव्यदक्ष गोरक्षक अक्षय पवार यांच्या प्रयत्नांमुळे २८ जून या दिवशी भोलावडे या गावाजवळ २ गायींना वाचवण्यात यश आले आहे. ज्यामध्ये १ गाय गाभण होती. (यावरून गोवंश हत्याबंदी कायद्याची कार्यवाही किती कठोरपणे केली पाहिजे, हे लक्षात येते ! – संपादक) या गायी इंदापूरच्या पशूवधगृहात नेत असतांना सदर टेंपो गोरक्षक पवार यांनी पोलिसांच्या कह्यात दिला. पोलिसांनी गायींची वैद्यकीय पडताळणी केल्यावर १ गाय गाभण असल्याचे समजल्यानंतर गोतस्कर दत्ता वाघमारे आणि नवनाथ नलावडे यांच्या विरुद्ध गुन्हा नोंद करण्यात आला आणि गायींची रवानगी आंबाडे येथील जानुबाईमाता गोशाळेमध्ये करण्यात आली आहे. या कारवाईमध्ये अनिकेत शिवतरे, रोहित देशमाने यांच्यासह अनेक गोरक्षकांनी विशेष परिश्रम घेतले.