‘नॅशनल कमिशन फॉर प्रोटेक्शन ऑफ चिल्ड्रेन राईट्स’ ही संघटना मुलांच्या हक्कांसाठी कार्य करते. मुलांच्या हक्कासाठी लढणारे ‘चाईल्ड राईट्स बॉडी’चे प्रियंक कानूंनगो म्हणाले, ‘‘महंमद पैगंबर यांची निंदा केल्याच्या निमित्ताने काढण्यात आलेले निषेध मोर्चे हिंसक झाले होते आणि त्यात लहान मुलांना सहभागी करून घेण्यात आले होते.’’ पुढे कानूंनगो यांनी ‘नूपुर शर्मा यांच्या कथित विधानाच्या निमित्ताने झालेल्या या जातीय आणि धार्मिक दंगलींमध्ये लहान मुलांना पुढे करण्यात आले. त्यामुळे त्याची सखोल चौकशी व्हावी’, अशी विनंतीही केंद्र शासनाला केली.
उत्तर भारतासह देशातील विविध भागांतील दंगलीमध्ये लहान मुलांचा सहभाग असणे
‘यापूर्वीही ‘सीएए’ (नागरिकत्व सुधारणा कायदा) आणि कृषी कायदे त्यांच्या विरोधात महिला अन् लहान मुले यांना पुढे करण्यात आले होते. त्याचप्रमाणे दंगलखोरांनी नुकत्याच उत्तर भारतात दंगली केल्या. त्यातही मुलांचा वापर करण्यात आला. त्यामुळे या सर्वच गोष्टींचे राष्ट्रीय अन्वेषण यंत्रणेच्या (‘एन्.आय.ए.’च्या) माध्यमातून अन्वेषण करण्यात यावे’, अशीही विनंती प्रियंक कानूंनगो यांनी ‘ट्विटर’च्या माध्यमातून केली आहे. कानूंनगो यांच्या संघटनेच्या मते नूपुर शर्मा आणि नवीन जिंदाल त्यांच्या अटकेसाठी १० जून या दिवशी भारतातील अनेक शहरांमध्ये आणि आणि देहलीतील जामा मशिदीच्या पुढे शेकडो लोकांनी दंगली केल्या. त्यात लहान मुलेही होती. कानपूरला झालेल्या दंगलीमध्ये ४० लोक घायाळ झाले. त्यात २० पोलीस अधिकारी होते.
दंगलीमध्ये लहान मुलांना सहभागी करण्यामागील षड्यंत्र
एकंदरच हा विषय अतिशय गंभीर आहे. प्रत्येक वेळी लहान मुले आणि महिला यांची ढाल पुढे करून आंदोलने करण्यात येतात. त्यामुळे पोलीस आणि सुरक्षादले यांना दंगल नियंत्रणात आणतांना कठोर भूमिका घेता येत नाही. याचा अपलाभ घेऊन धर्मांधांच्या संघटना हिंसक निदर्शने करतात, सरकारी मालमत्तेची हानी करतात आणि पोलिसांवर आक्रमणे करतात. या षड्यंत्राचे सखोल अन्वेषण होणे आवश्यक आहे. नुकतीच झालेली कानपूर दंगल नियंत्रणात आणण्यासाठी पोलिसांना ५ घंटे लागले. दंगलीमध्ये लहान मुले समोर असल्याने पोलिसांना निदर्शकांवर बळाचा वापर करता येत नाही; कारण काही अपरिमित घडले की, हेच लोक संयुक्त राष्ट्रांपर्यंत गळे काढतात आणि भारताची आंतरराष्ट्रीय स्तरावर मानहानी करायला मोकळे असतात. त्यामुळे कायदा आणि सुव्यवस्था व्यवस्थित राखण्यासाठी या विषयाचा गांभीर्याने विचार करणे आवश्यक आहे.
श्रीकृष्णार्पणमस्तु ।
– (पू.) अधिवक्ता सुरेश कुलकर्णी, संस्थापक सदस्य, हिंदु विधीज्ञ परिषद आणि अधिवक्ता, मुंबई उच्च न्यायालय. (२७.६.२०२२)