भारतामध्ये लोकांवर आणि त्यांच्या धार्मिक स्थळांवर होणार्‍या वाढत्या आक्रमणाविषयी आम्ही चिंतीत ! – अमेरिकेचा कांगावा

अमेरिकेचे परराष्ट्रमंत्री अँटोनी ब्लिंकन यांनी ‘जगातील धार्मिक स्वातंत्र्य’ या विषयावर आयोजित चर्चेमध्ये बोलत असताना वरील विधान केले.

ज्ञानवापीचे ठीक आहे; पण प्रत्येकच मशिदीत शिवलिंग का पहावे ? – सरसंघचालक डॉ. मोहन भागवत  

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा तृतीय वर्ष शिक्षा वर्गाचा समारोप कार्यक्रम

भारतीय तटरक्षक दलाने पाकिस्तानच्या ७ खलाशांना घेतले कह्यात

भारतीय तटरक्षक दलाने गुजरातमधील आंतरराष्ट्रीय सागरी सीमेजवळ पाकिस्तानच्या ७ खलाशांना कह्यात घेतले. ‘अल् नोमान’ हे पाकिस्तानी जहाज भारताच्या सागरी सीमेत घुसले होते.

जशपूर (छत्तीसगड) येथे नसीमने पूजासाहित्यावर लघवीने भरलेली पिशवी फेकली !

हिंदूंकडून मुसलमानांवर अत्याचार होत असल्याची सतत आवई उठवणारी पुरो(अधो)गामी टोळी आता गप्प का ? की हिंदूंच्या विरोधात मुसलमानांनी काहीही केले, तरी ते क्षम्य आहे ?

सुरक्षा काढून घेण्यावरून पंजाब-हरियाण उच्च न्यायालयाने पंजाबच्या आम आदमी पक्षाच्या सरकारला फटकारले !

आम आदमी पक्षाच्या सरकारला फटकारण्यासह त्याला शिक्षा करण्यात यावी, असेही जनतेला वाटते !

काश्मीरमधील हिंदूंच्या वारंवार होणार्‍या हत्यांसंदर्भात मान्यवरांच्या प्रतिक्रिया !

नरेंद्र मोदी शासनाने आतंकवादाविरुद्ध लढा देण्याची वेळ आली आहे. आता मुसलमानांनीही आतंकवादाच्या विरोधात बोलून हिंदूंच्या पाठीशी उभे रहाणे आवश्यक आहे.

बुद्धीप्रामाण्यवाद्यांची पात्रता !

‘बुद्धीप्रामाण्यवाद्यांनी बुद्धीपलीकडील ‘देव नसतो’, असे म्हणणे, हे बालवाडीतील मुलाने ‘वैद्य, अधिवक्ता इत्यादी नसतात’, असे म्हणण्यासारखे आहे !’

पंतप्रधान येणार असलेल्या सभामंडपाचे भूमीपूजन पार पडले !

जगद्गुरु संत तुकाराम महाराजांची मूर्ती आणि शिळा मंदिराचा लोकार्पण सोहळा यांसाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी १४ जून या दिवशी देहू येथे येणार आहेत. ज्या मंडपातून पंतप्रधान वारकऱ्यांना संबोधित करणार आहेत, त्या सभा मंडपाचे भूमीपूजन २ जून या दिवशी झाले.

… तर पुन्हा मास्क वापरण्याचा निर्णय घ्यावा लागेल ! – उपमुख्यमंत्री

कोरोनाच्या तिन्ही लाटांमध्ये राज्यातील जनतेने कोरोनाचा अनुभव घेतला आहे. राज्यात कोरोनाचे रुग्ण वाढत आहेत. रुग्णसंख्या अशीच वाढत राहिली, तर राज्यात पुन्हा मास्क वापरण्याचा निर्णय घ्यावा लागेल !

(म्हणे) ‘लिंग आणि योनी यांची पूजा करून देशाला नष्ट करत आहेत हिंदू !’

एका राष्ट्रीय वृत्तवाहिनीवरून अशा प्रकारे कोट्यवधी हिंदूंच्या धार्मिक भावनांना पायदळी तुडवणे अक्षम्य आहे. पोलिसांनी अशांवर स्वत:हून कठोर कारवाई करायला हवी !