सुरक्षा काढून घेण्यावरून पंजाब-हरियाण उच्च न्यायालयाने पंजाबच्या आम आदमी पक्षाच्या सरकारला फटकारले !

४२४ लोकांना पुन्हा सुरक्षा देण्याचा आदेश !

गायक सिद्धू मुसेवाला (डावीकडे ) आणि भगवंत मान

चंडीगड – पंजाब सरकारने राज्यातील ४०० हून अधिक व्यक्तींची सुरक्षा काढून घेतल्याच्या दुसर्‍याच दिवशी गायक सिद्धू मुसेवाला याची हत्या झाली. सुरक्षा काढून घेतल्याच्या सरकारच्या निर्णयाला पंजाब-हरियाण उच्च न्यायालयात आव्हान देण्यात आले असता न्यायालयाने पंजाब सरकारला फटकारत ४२४ जणांना पुन्हा सुरक्षा देण्याचा आदेश दिला आहे. या लोकांची नावे उघड झाल्यावरूनही न्यायालयाने पंजाब सरकारला फटकारले. न्यायालयाने म्हटले की, एखाद्याची सुरक्षा हटवायची असली, तरी परिस्थितीचा योग्य आढावा घ्यावा, सर्व पैलूंवर विचारमंथन व्हायला हवे, तरच तसा निर्णय घ्यावा.

संपादकीय भूमिका

  • आम आदमी पक्षाच्या सरकारला फटकारण्यासह त्याला शिक्षा करण्यात यावी, असेही जनतेला वाटते !