राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा तृतीय वर्ष शिक्षा वर्गाचा समारोप कार्यक्रम

नागपूर – श्रीरामजन्मभूमीच्या आंदोलनानंतर अयोध्येत श्रीराममंदिर साकारले जात आहे. एक स्वप्नपूर्ती झाली आहे. त्यानंतर संघ कोणत्याही आंदोलनात उतरलेला नाही. आता ज्ञानवापीचे सूत्र समोर आले आहे. काही ठिकाणांविषयी आमची वेगळी श्रद्धा होती आणि आम्ही त्याविषयी चर्चा केली; पण प्रतिदिन नवे सूत्र आणू नये. ज्ञानवापीविषयी आमची श्रद्धा परंपरेतून चालत आली आहे; मात्र आता प्रत्येक मशिदीत शिवलिंग का पहावे ?, असा प्रश्न राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक डॉ. मोहन भागवत यांनी उपस्थित केला. २ जून या दिवशी येथील रेशीमबाग मैदानात आयोजित संघाच्या तृतीय वर्ष शिक्षा वर्गाच्या समारोपाच्या कार्यक्रमात ते बोलत होते.
#WATCH | “…We shouldn’t bring out a new matter daily. Why should we escalate dispute? We have devotion towards #Gyanvapi and we are doing something as per that, it is alright. But why look for a Shivling in every masjid?…” says RSS chief as he speaks on Gyanvapi mosque issue. pic.twitter.com/eYLmaEEQY4
— ANI (@ANI) June 2, 2022
डॉ. भागवत पुढे म्हणाले की,
१. ज्ञानवापी हे आस्थेशी निगडित सूत्र आहे. हा इतिहास आहे. तो आम्ही पालटू शकत नाही. तो ना आजच्या हिंदूंनी बनवला, ना आजच्या मुसलमानांनी.
२. इस्लाम बाहेरून आक्रमणकर्त्यांसमवेत आला. त्या आक्रमणांमध्ये भारत स्वतंत्र होण्याची इच्छा असणार्यांचे मनोधैर्य खच्ची करण्यासाठी देवस्थानांची तोडफोड करण्यात आली.
३. ज्ञानवापीविषयी दोन्ही पक्षांनी समन्वय, सुसंवाद आणि सामंजस्य यांद्वारे मार्ग काढायला हवा होता; पण काहींनी पटत नाही आणि ते न्यायालयात धाव घेतात. मग निदान न्यायालयाच्या निकालाचा आदर आणि पालन तरी करायला हवे.
४. राज्यघटनेवर आधारित न्यायालयाच्या निर्णयावरही अनुचित टीका व्हायला नको. हिंदू मुसलमानांच्या विरोधात विचार करत नाहीत. आमचा कुणाच्याही पूजेला विरोध नाही.
५. आपल्या देशात यहुदी आणि पारसी या शरणार्थींच्या उपासना आल्या. आक्रमक मुसलमानांची उपासना आली. आपले नाते मुसलमान आक्रमकांशी नाही, तर येथील मुसलमानांशी आहे. भारताबाहेरून आक्रमण केलेले मूळ आक्रमक सोडून धर्मांतरित मुसलमानांचे पूर्वज हिंदु होते, हे लक्षात घेतले पाहिजे. हसन खाँ मेवाती आणि अशफाकउल्ला खान यांनी देशासाठी बलीदान दिले, हे आम्ही विसरू शकत नाही.
महिलेच्या छातीला स्पर्श करणे, हा बलात्काराचा प्रयत्न नाही ! – उच्च न्यायालय
Railway Bedsheets Theft : रेल्वेच्या वातानुकूलित डब्यांमधून चादर, ब्लँकेट आणि टॉवेल चोरीला जाण्याच्या घटनांमध्ये वाढ !
Amarkantak Temple Donation Scam : अमरकंटक (मध्यप्रदेश) येथील नर्मदा उगम मंदिरातील सोने-चांदी गायब !
Three Language Policy : इंग्रजी भारताचीच स्थानिक भाषा मानली जाऊ शकते का ? – सर्वाेच्च न्यायालयाचा प्रश्न
Karnataka AI University : बेंगळुरूत देशातील पहिले ‘एआय’ विद्यापीठ चालू करणार !
Telangana AI Training : तेलंगाणातील काँग्रेस सरकार ८० सहस्र अल्पसंख्यांक विद्यार्थ्यांना एआय आणि डिजिटल सुरक्षा यांचे विनामूल्य प्रशिक्षण देणार !