पुणे, २ जून (वार्ता.) – जगद्गुरु संत तुकाराम महाराजांची मूर्ती आणि शिळा मंदिराचा लोकार्पण सोहळा यांसाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी १४ जून या दिवशी देहू येथे येणार आहेत. ज्या मंडपातून पंतप्रधान वारकऱ्यांना संबोधित करणार आहेत, त्या सभा मंडपाचे भूमीपूजन २ जून या दिवशी अखिल भारतीय संत समितीचे अध्यक्ष प.पू. स्वामी गोविंददेव गिरि महाराज आणि ह.भ.प. कुरेकर महाराज यांच्या उपस्थितीत झाले. या लोकार्पण सोहळ्याच्या कार्यक्रमास महाराष्ट्रातील अनेक वारकरी, तसेच दिंड्या उपस्थित रहाणार आहेत. जवळपास ४० सहस्र जणांचा समुदाय कार्यक्रमास येणार असल्याची माहिती विश्वस्त संजय महाराज मोरे यांनी दिली.