हिंदूंनी काढलेल्या शांततापूर्ण मोर्च्यानंतर नसीमला अटक !
जशपूर (छत्तीसगड) – येथे काही हिंदु महिला एका रस्त्याच्या कडेला वटसावित्रीची पूजा करत असतांना नसीम नावाच्या एका मुसलमानाने तेथील पूजासाहित्यावर लघवीने भरलेली पिशवी फेकल्याची घटना समोर आली आहे. पोलिसांनी नसीमला अटक केली आहे. घटना ३० मे या दिवशीची असून जशपूर जिल्ह्यातील पुरणानगर येथे घडली.
काही हिंदु महिला येथे वटसावित्रीची पूजा करत असतांना तेथे नसीम आला आणि पँट उघडून ‘तुमच्या प्रसादात गंगाजल मिळवतो’, अशा प्रकारे अश्लाघ्य शब्दांत बोलू लागला. महिलांनी त्याला हटकल्याने तो तेथून पळून गेला. कालांतराने परत येऊन त्याने लघवीने भरलेली पिशवी पूजासाहित्यावर फेकून महिलांना शिव्या द्यायला लागला. नसीम हा चीर बगीचा या मुसलमानबहुल क्षेत्रातील रहिवासी आहे.
Speaking to OpIndia, the Jashpurnagar police have informed that the culprit has been arrested and sent to custody under charges as per IPC sections 295, 295A, 153A and 505(2)https://t.co/6IujaD8LX6
— OpIndia.com (@OpIndia_com) June 2, 2022
या घटनेचा निषेध करण्यासाठी हिंदूंनी मोर्चा काढून नसीमला अटक करण्याची मागणी केली. १ जूनला ‘जशपूर बंद’चे आवाहनही करण्यात आले होते. मोर्चा शांततापूर्ण रूपाने पार पडला. (प्रत्येक वेळी मुसलमानांनी काही केले की, प्रतिक्रिया म्हणून मोर्चा काढून नव्हे, तर हिंदूंनी संघटित होऊन अशा घटना घडणारच नाहीत, अशी स्वत:ची पत निर्माण केली पाहिजे. हे हिंदूंना कधी लक्षात येणार ? – संपादक)
संपादकीय भूमिका
|