वांद्रे येथील शासकीय भूखंड कवडीमोल किंमतीने विकून १ सहस्र कोटी रुपयांचा घोटाळा !

वांद्रे (पश्चिम) येथील बँडस्टँड या उच्चभ्रू वस्तीत ‘ताज’ उपाहारगृहाच्या शेजारी समुद्रकिनारी मोक्याच्या ठिकाणी असणारा १ एकर ५ गुंठे हा शासकीय मालकीचा भूखंड ‘रूस्तमजी ब्लिल्डर’ला कवडीमोल किमतीत विकण्यात आला आहे….

वसई शहरात भेसळखोरीत वाढ !

आरोग्य विभागाकडून वसई शहरातील नागरिकांचे आरोग्य जपण्यासाठी कोणतीही यंत्रणा उपलब्ध नाही. शहरातील खाद्यपदार्थांच्या दुकानांना परवाने किंवा ‘ना हरकत दाखले’ देतांना त्यांची स्वच्छता आणि गुणवत्ता यांची पडताळणी केली जात नाही.

कोरेगाव भीमा दंगल प्रकरणी शरद पवार यांची जे.एन्. पटेल आयोगाकडे साक्ष नोंद !

कोरेगाव भीमा येथील दंगलीच्या प्रकरणी पू. भिडेगुरुजी यांचे शरद पवार यांनी नाव घेतले; मात्र नंतर घूमजाव करून त्यांचा सहभाग नसल्याचे सांगितले. शरद पवार यांनी कोणत्या आधारावर त्यांचे नाव घेतले ?

(म्हणे) ‘मराठवाड्यातील लोकांना कामधंदे नाहीत !’ – तहसीलदार किरण आंबेकर

मंत्री आणि वरिष्ठ अधिकारी यांच्या उपस्थितीत तहसीलदार असे वक्तव्य करत असतील, तर ते जनतेशी कसे वागत असतील, याचा विचारच न केलेला बरा ! 

अमेरिका पुराणमतवादी होणार ?

स्वातंत्र्याला या संयमाचे आणि त्यागाचे कोंदण असल्यास कुठलीही कृती ही विवेकाला धरून होते. ‘अमेरिकेतील सामाजिक आणि सांस्कृतिक अधःपतन तेथील समाजधुरिणी रोखतील का ?’, हे ठाऊक नाही; मात्र भारतात तशी स्थिती उद्भवू नये; म्हणून आदर्श समाजरचनेविषयी नियम सांगणाऱ्या हिंदु राष्ट्राची स्थापना अपरिहार्य आहे !

सावरदरे (पुणे) येथे राष्ट्रध्वजाचा अवमान केल्याप्रकरणी जिल्हा परिषदेच्या मुख्याध्यापकांच्या विरोधात तक्रार !

शिक्षकच राष्ट्रध्वजाचा अवमान करत असतील, तर ते विद्यार्थ्यांच्या मनात राष्ट्रप्रेम कसे रुजवणार ? त्यामुळे संबंधितांवर कठोर कारवाई होणे अपेक्षित आहे.

वाळू तस्करांच्या विरोधात भंडारा जिल्हा प्रशासन सरसावले !

काही दिवसांपूर्वी येथील उपविभागीय अधिकारी रवींद्र राठोड यांच्यावर वाळू तस्करांनी आक्रमण केले होते. त्या प्रकरणाची जिल्हा प्रशासनाने गंभीरपणे नोंद घेतली आहे.

नागपूर येथे दुपारी १२ ते ४ या वेळेत रहदारीची सिग्नल यंत्रणा बंद !

वाढत्या उन्हामुळे येथे दुपारी १२ ते ४ या वेळेत रहदारीची सिग्नल यंत्रणा बंद रहाणार आहे. सिग्नल लागल्यास थांबावे लागते; पण उन्हाच्या झळांमुळे तितका काळ थांबणेही कठीण होते. वाहतूक शाखेकडून हा निर्णय घेण्यात आला. यामुळे वाहनचालकांना दिलासा मिळाला आहे.

गडचिरोली येथील जंगल परिसरात वाघाच्या आक्रमणात तरुणाचा मृत्यू !

हिंस्र पशू असणाऱ्या जंगलात न फिरण्याविषयी वनविभागाने नागरिकांनी आधीच सतर्क का केले नाही ? किंवा त्यासंदर्भातील सूचना का लावलेली नाही ? एकाचा मृत्यू झाल्यावर आवाहन करून काय उपयोग ?

हिंदूंनी संघटित होऊन विरोध करावा !

मदुराई (तमिळनाडू) येथील धर्मपूरम् अधीनम् या मठाच्या ‘पट्टिना प्रवेशम्’ या पारंपरिक धार्मिक कार्यक्रमाच्या आयोजनाला प्रशासनाने अनुमती नाकारली आहे. ‘पट्टिना प्रवेशम्’ म्हणजे शैव मठाच्या महंतांना पालखीमध्ये बसवून ती पालखी खांद्यावर उचलून नेण्याची परंपरा आहे.