राज ठाकरे यांनी खरी मर्दानगी दाखवली ! – कालीचरण महाराज
मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी खरी मर्दानगी दाखवली आहे. भोंग्यांविषयीची राज ठाकरे यांची भूमिका योग्य असून त्याला आमचा संपूर्ण पाठिंबा आहे, असे मत कालीचरण महाराज यांनी व्यक्त केले.
मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी खरी मर्दानगी दाखवली आहे. भोंग्यांविषयीची राज ठाकरे यांची भूमिका योग्य असून त्याला आमचा संपूर्ण पाठिंबा आहे, असे मत कालीचरण महाराज यांनी व्यक्त केले.
१७ वर्षांच्या मुलीवर अंगारे-धुपारे देऊन पूजा करण्याच्या नावाखाली ३ मे या दिवशी सामूहिक अत्याचार केल्याप्रकरणी २ भोंदूबाबांना पोलिसांनी अटक केली आहे. मनोहर कोल्हे आणि युवराज सोनटक्के अशी त्यांची नावे आहेत.
नगर येथील अजान भोंग्याविना ! श्रीरामपूरमधील सय्यदबाबा चौकातील मशिदीसमोर आणि छत्रपती शिवाजी महाराज चौकात सामूहिक हनुमान चालिसाचे पठण करणार्या मनसे कार्यकर्त्यांना श्रीरामपूर पोलिसांनी अटक केली.
‘सामर्थ्य आहे चळवळेंचे जो जे करील तयाचे परंतु तेथे भगवंताचे अधिष्ठान पाहिजे ।’ या वचनानुसार आध्यात्मिक साधनेला महत्त्व देऊन या हिंदु राष्ट्राच्या कार्यात प्रत्येकाने सहभागी होणे आवश्यक आहे, असे मार्गदर्शन सदगुरु नंदकुमार जाधव यांनी केले.
खासदार नवनीत राणा आणि आमदार रवि राणा यांची १२ दिवसांनंतर ५ मे या दिवशी कारागृहातून जामिनावर सुटका करण्यात आली आहे. नवनीत राणा यांना होणाऱ्या मानेच्या त्रासामुळे त्या लीलावती रुग्णालयात भरती झाल्या आहेत.
२१ एप्रिलच्या रात्री १ वाजता पोटूळ रेल्वेस्थानकावर सिग्नलची वायर कापून देवगिरी एक्सप्रेसवर ७ – ८ जणांच्या टोळीने दरोडा टाकला होता. येथे एकाच मासात रेल्वेवर तिसरा दरोडा पडला होता.
हिंदु पालकांनो, कॉन्व्हेंट शाळांचे ख्रिस्तीधार्जिणे स्वरूप पहाता पाल्यांसाठी तेथे प्रवेश घ्यायचा कि नाही, ते ठरवा !
सर्वोच्च न्यायालयाने राज्य सरकारच्या कायद्याविषयी भाष्य केलेले नाही. त्यामुळे न्यायालयाचा निर्णय नेमका काय आहे ? याविषयी राज्य सरकारमध्ये संभ्रम निर्माण झाला आहे.
इतर मागासवर्गीय आयोगाची सर्वंकष माहिती लवकरात लवकर सादर करावी, यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसच्या मंत्र्यांनी ५ मे या दिवशी इतर मागासवर्गीय आयोगाचे जयंतकुमार बांठिया यांसह अन्य सदस्य यांची भेट घेतली.
भाविकांना कृपाप्रसाद पाठवण्यासाठी पश्चिम महाराष्ट्र देवस्थान व्यवस्थापन समिती आणि भारतीय टपाल विभाग यांचे अधिकृत ‘प्रसाद पोस्टकार्ड’ पाकीट सिद्ध करण्यात आले असून भारतात, तसेच जगभरात कुठेही भाविकाला प्रसाद पोच करण्याची व्यवस्था करण्यात आली आहे.