नसरापूर (पुणे) – सावरदरे (तालुका भोर) येथील जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळेमध्ये १ मे या दिवशी ‘महाराष्ट्रदिना’निमित्त फडकवलेला राष्ट्रध्वज सूर्यास्तापूर्वी न उतरवता ३ दिवस तसाच फडकवत ठेवला होता. या प्रकरणी शाळेचे मुख्याध्यापक संजय पापळ यांच्या विरोधात राजगड पोलीस ठाण्यात तक्रार प्रविष्ट केली आहे. या घटनेस उत्तरदायी असल्याप्रकरणी प्रवीण नांदे, अमजद पटेल आणि सौ. शीतल
टापरे या ३ शिक्षकांवर ठपका ठेवण्यात आला आहे.
याविषयी तिसर्या दिवशी गावातील काही सूज्ञ नागरिकांनी राजगड पोलिसांना माहिती दिली. त्यानंतर ३ मे या दिवशीतातडीने पोलीस शिपाई योगेश राजीवडे यांनी सन्मानाने राष्ट्रध्वज उतरवून कह्यात घेतला. याविषयी भोरच्या गटशिक्षणाधिकारी अश्विनी सोनवणे म्हणाल्या, ‘‘या घटनेविषयी संबंधित शिक्षकांवर कारवाई करण्यासाठीचा प्रस्ताव जिल्हा परिषदेकडे पाठवण्यात येईल.’
संपादकीय भूमिकाशिक्षकच राष्ट्रध्वजाचा अवमान करत असतील, तर ते विद्यार्थ्यांच्या मनात राष्ट्रप्रेम कसे रुजवणार ? त्यामुळे संबंधितांवर कठोर कारवाई होणे अपेक्षित आहे. |