नांदेड – मराठवाड्यातील लोकांना काही कामधंदे नाहीत. त्यामुळे अभ्यास करून तक्रारी करणाऱ्यांच्या संख्येत मोठी वाढ झाली आहे, असे आक्षेपार्ह वक्तव्य येथील तहसीलदार किरण आंबेकर यांनी ५ मे या दिवशी येथे एका कार्यक्रमात केले. या वेळी महसूलमंत्री बाळासाहेब थोरात आणि विभागीय आयुक्त गोविंद केंद्रेकर उपस्थित होते. आंबेकर यांच्या आक्षेपार्ह वक्तव्यप्रकरणी सामाजिक माध्यमांतून त्यांच्यावर टीका करून त्यांचा निषेध नोंदवला जात आहे.
किरण आंबेकर म्हणाले की, मराठवाड्यात विभागीय चौकशांचे प्रमाण अधिक आहे. असे म्हटल्यानंतर साहेबांनी मला विचारले की, हे कशामुळे ? त्या वेळी मी सांगितले की, मराठवाड्यात थोडी परिस्थिती बिकट आहे. लोकांना कामधंदे नाहीत. त्यामुळे अभ्यासहीन तक्रारी करून कोणत्याही पद्धतीचे आरोप केले जातात. यातील काही आरोप सत्यही असतात.
संपादकीय भूमिकामंत्री आणि वरिष्ठ अधिकारी यांच्या उपस्थितीत तहसीलदार असे वक्तव्य करत असतील, तर ते जनतेशी कसे वागत असतील, याचा विचारच न केलेला बरा ! |