पुणे – ‘नो पार्किंग’मध्ये ‘स्विफ्ट डिझायर’ गाडीचा ‘जॅमर’ (लोखंडी सांगाडा) काढण्यासाठी १ सहस्र रुपयांची लाच मागितली. या प्रकरणी साहाय्यक फौजदार किरण रोटे आणि ‘ट्रॅफिक वॉर्डन’ अनिस आगा यांच्यावर समर्थ पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे. लाच देणे मान्य नसल्याने ३० वर्षीय तरुणाने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार प्रविष्ट केली होती. (पोलीस खात्यातील तळागाळापर्यंत मुरलेला भ्रष्टाचार समूळ नष्ट करण्यासाठी कठोर शिक्षा हाच एकमेव पर्याय ! – संपादक)