बालिकेवर अत्याचार करण्याचा प्रयत्न करणारे वडील आणि मुलगा यांना अटक !

अल्पवयीन मुलींवर अत्याचार करणाऱ्यांना आजन्म कारावासाची शिक्षा झाल्याविना असे प्रकार थांबणार नाहीत !

ब्राह्मण समाजाला शिवीगाळ केल्याप्रकरणी भाजपच्या जिल्हाध्यक्षांवर गुन्हा नोंद !

भाजपच्या ग्रामीण जिल्हाध्यक्षा निवेदिता चौधरी यांनी ब्राह्मण समाजाला उद्देशून शिवीगाळ केल्याप्रकरणी त्यांच्यावर ३ मे या दिवशी पोलिसांनी गुन्हा नोंद केला आहे.

इस्टर्न एक्स्प्रेस हायवेवरील जोगेश्वरी-विक्रोळी लिंकरोड जंक्शनचा उड्डाणपूल पुढील १२ दिवस बंद !

इस्टर्न एक्स्प्रेस हायवेवरील जोगेश्वरी-विक्रोळी लिंकरोड जंक्शनचा उड्डाणपूल पुढील १२ दिवस बंद रहाणार आहे. दुरुस्तीच्या कामासाठी १३ ते २४ मेपर्यंत उड्डाणपूल वाहतुकीसाठी बंद राहील.

नाशिक येथे १४ लाखांचे विदेशी मद्य जप्त !

नाशिक येथील राज्य उत्पादन शुल्क विभागाने गोवा निर्मित तब्बल १४ लाख रुपये किमतीचा मद्यसाठा आणि १० लाख रुपयांचे वाहन, असा एकूण २४ लाख रुपयांचा मुद्देमाल ९ मे या दिवशी जप्त केला आहे.

निधर्मीवाद्यांना न्यायालयाची चपराक !

ज्या लोकांना वाटते की, पाकिस्तान त्यांच्यासाठी योग्य जागा आहे, त्यांनी लक्षात ठेवले पाहिजे की, भारतात त्यांच्या विरोधात कधी काही चुकीचे घडलेले नाही, असे विधान केरळ उच्च न्यायालयाने केले आहे.

वेलची खाण्याचे लाभ आणि ती कुणी खाऊ नये ?

वेलची ही मानवाच्या तोंडाच्या आरोग्यासाठीही उत्तम औषध आहे. तोंडाला दुर्गंध येणे, दातांचे संसर्ग, हिरड्यांचे आजार, तसेच तोंडातील जखमा दूर करणे यांसाठी वेलची उपयुक्त आहे.

‘मूर्तींचा भंग करवतांना आणि हिंदूंची मंदिरे पाडतांनाचे दृश्य बघतांना मला किती आनंद होतो’, असे पत्रात लिहिणारा फ्रान्सिस झेवियर म्हणे ‘गोंयचो सायब’ !

१० मे २०२२ या दिवशी आपण ‘धर्मांतरे घडवून न आणणाऱ्या अधिकाऱ्यांना शिक्षा द्यावी, अशी मागणी करणारा झेवियर !’, यांविषयी वाचले. आज त्यापुढील भाग येथे देत आहोत.

सनातनच्या ग्रंथांतील ज्ञानाचा विविध माध्यमांतून होणारा व्यापक प्रसार !

आज परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या ग्रंथसंपदेमुळे सर्वत्र हिंदु धर्म आणि अध्यात्म यांचा प्रसार होत आहे. परात्पर गुरु डॉक्टरांच्या या व्यापक ग्रंथकार्याच्या संदर्भातील विविध पैलूंची माहिती देणाऱ्या लेखमालिकेतील या तिसऱ्या लेखात ग्रंथांतील ज्ञान ‘नियतकालिके, संकेतस्थळे, सामाजिक प्रसारमाध्यमे इत्यादी माध्यमांतून भारतभर आणि जगभर कसे पोचत आहे’, याविषयी सांगितले आहे.

ताजमहाल नव्हे, तर हिंदूंचे शिवालय असलेले प्राचीन तेजोमहालयच !

‘ताजमहाल’ हे पूर्वी ‘शिवालय’ होते’, असे अनेक पुरावे पुरातत्व विभागाचे अधिकारी, इतर पुरातत्वतज्ञ, इतिहासाचे अभ्यासक, तसेच देशविदेशांतील तज्ञ सांगतात. नुकतीच अलाहाबाद उच्च न्यायालयामध्ये प्रविष्ट केलेल्या याचिकेत आगऱ्यातील ताजमहालच्या परिसरातील २० हून अधिक खोल्या उघडण्याचा आदेश देण्याची मागणी करण्यात आली आहे.

अन्न परब्रह्म !

अन्नाची नासाडी न करण्याचे संस्कार झाले, तर भविष्यात तेच त्यांच्या अंगवळणी पडल्याने अन्न वाचवण्यास साहाय्यभूत होईल. त्यामुळे असे धडे शिकवण्यासमवेत विद्यार्थ्यांना अन्नाकडे प्रसाद म्हणून पहाण्याची भावनाही निर्माण होण्यासाठी प्रार्थना, नामजप हेही जोडीला शिकवणे अत्यावश्यक आहे.