नाशिक येथील मनसे शहराध्यक्ष पुन्हा तडीपार; जिल्हाध्यक्षांना अटक !

हनुमान चालिसा प्रकरणात गुन्हा नोंद झाल्यावर पसार होऊन अटकेनंतर जामीन मिळालेले मनसेचे शहराध्यक्ष दिलीप दातीर यांना साहाय्यक पोलीस आयुक्तांनी १० दिवसांसाठी तडीपार केले आहे.

मनसेचे संदीप देशपांडे यांच्या जामिनावर १७ मे या दिवशी सुनावणी !

मनसचे सरचिटणीस संदीप देशपांडे आणि मनसेचे संतोष धुरी यांच्या जामिनाच्या अर्जावर १७ मे या दिवशी सुनावणी होणार आहे. न्यायाधीश उपस्थित राहू न शकल्यामुळे १० मे या दिवशी मुंबई उच्च न्यायालयात या जामिनावर सुनावणी होऊ शकली नाही.

माझ्यावर गुन्हे नोंद करण्यामागे राजकीय षड्यंत्र ! – गणेश नाईक, आमदार, भाजप

एका महिलेने गणेश नाईक यांच्यावर बलात्कार करणे आणि धमकावणे या प्रकरणी पोलीस ठाण्यात तक्रार प्रविष्ट केली होती. त्यावर उच्च न्यायालयाने नाईक यांना अटकपूर्व जामीन दिला आहे. त्यानंतर ते पत्रकारांशी बोलत होते.

जून-जुलैमध्ये कोरोनाची चौथी लाट येण्याची शक्यता ! – आरोग्यमंत्री

कोरोनाची रुग्णसंख्या सध्या वाढत असतांना परिस्थिती मात्र नियंत्रणात आहे; मात्र अशा स्थितीतही चौथी लाट येण्याचा धोका आहे. जून-जुलैमध्ये कोरोनाची चौथी लाट येऊ शकते, अशी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली आहे.

नागपूर येथे २ मासांत उष्माघाताचे ११ बळी !

उत्तरेकडील राजस्थानमधून येणाऱ्या उष्णतेच्या लाटांमुळे तापमानाचा पारा ४५ ते ४६ डिग्रीपर्यंत पोचला आहे. त्यामुळे उष्माघाताच्या रुग्णांची संख्या पुष्कळ वाढली आहे. गेल्या २ मासांत केवळ नागपूर येथे ११ लोकांचा उष्माघाताने मृत्यू झाला आहे.

संभाजीनगर येथे शिवसेनेचे आमदार आणि माजी महापौर यांच्या शिष्टमंडळाकडून पाणीटंचाई दूर होण्यासाठी अनेक सूचना !

अनेक वर्षांपासून असलेली पाणी समस्या न सुटणे हे गंभीर आहे. पाण्याचा प्रश्न न सुटल्यामुळे नागरिकांचा संयम संपून उद्या नागरिकांनी कायदा हातात घेतल्यास त्याचे दायित्व कोण घेणार ?

मुंब्रा पोलिसांनी धाडीमध्ये ६ कोटी रुपये घेतल्याचे पत्र सामाजिक माध्यमांवर प्रसारित !

मुंब्रा पोलिसांवर तब्बल ६ कोटी रुपये वसुलीच्या आरोपाचे पत्र सामाजिक माध्यमांवर प्रसारित झाले. त्यानंतर या संपूर्ण प्रकरणाची पोलीस उपायुक्तांच्या माध्यमातून चौकशी करण्यात येत आहे.

सनातन संस्कृतीच्या पुनरुज्जीवनाचा काळ !

हरियाणात ५ सहस्र वर्षांपूर्वीची दागिने बनवण्याच्या मोठ्या व्यवसायाची जागा नुकतीच मिळणे किंवा तमिळनाडूत ४ सहस्र २०० वर्षांपूर्वी लोखंड वापरले जात असल्याचे मुख्यमंत्र्यांनी विधीमंडळात सांगणे यांसारख्या गोष्टी हिंदु संस्कृतीची महानता पुन:पुन्हा सिद्ध करत आहेत. असे असतांना अरिफ खान यांना ‘हीच गोष्ट योग्य शिक्षणाद्वारे शिकवली गेली पाहिजे’, असे वाटणे अत्यंत स्वाभाविक आहे !

संभाजीनगर येथे देवमुद्राच्या शिष्यांकडून नृत्यसाधना कार्यक्रम !

जागतिक नृत्यदिनानिमित्त ‘देवमुद्रा अ मूव्हमेंट स्कूल’ संस्थेच्या वतीने नृत्यसाधना कार्यक्रम ९ मे या दिवशी घेण्यात आला.

नवी मुंबईतील एम्.जी.एम्. रुग्णालयात ४ वर्षीय मुलाचा मृत्यू !

कळंबोली येथील एम्.जी.एम्. रुग्णालयात ४ वर्षीय मुलाचा मृत्यू झाला. पाठीवर गाठ आली असल्याने त्याला उपचारांसाठी रुग्णालयात भरती केले होते.