नाशिक येथे १४ लाखांचे विदेशी मद्य जप्त !

प्रतिकात्मक छायाचित्र

नाशिक – येथील राज्य उत्पादन शुल्क विभागाने गोवा निर्मित तब्बल १४ लाख रुपये किमतीचा मद्यसाठा आणि १० लाख रुपयांचे वाहन, असा एकूण २४ लाख रुपयांचा मुद्देमाल ९ मे या दिवशी जप्त केला आहे. कुरियरच्या सिलबंद ट्रॅकमध्ये विदेशी मद्य आणि बियर यांचा लाखो रुपये किमतीचा साठा चोर मार्गाने महाराष्ट्र आणि गोवा येथे विक्रीसाठी नेत असतांना राज्य उत्पादन शुल्क विभागाने ही कारवाई केली आहे. या कारवाईत वाहनचालक बिश्नोई याला अटक केली आहे, तर मद्य तस्करीचा हा प्रकार कुणाच्या माध्यमातून चालू होता ?, याचा शोध पोलीस घेत आहेत. येथील द्वारकामार्गे मद्य नेणारे वाहन धुळे येथे जात होते.