बालिकेवर अत्याचार करण्याचा प्रयत्न करणारे वडील आणि मुलगा यांना अटक !

संभाजीनगर – चॉकलेट देण्याच्या बहाण्याने घरी बोलावून वडील आणि मुलगा यांनी एका १० वर्षीय बालिकेवर लैंगिक अत्याचाराचा प्रयत्न केला आहे. ही घटना ३ मे या दिवशी सायंकाळी ६ वाजता भीमनगर भावसिंगपूर येथे घडली. या प्रकरणी उत्तम गडकर आणि त्याचा मुलगा रवि गडकर यांना पोलिसांनी अटक केली असून त्यांची न्यायालयीन कोठडीत रवानगी केली आहे, तर किरण गडकर हा पसार आहे.

संपादकीय भूमिका

अल्पवयीन मुलींवर अत्याचार करणाऱ्यांना आजन्म कारावासाची शिक्षा झाल्याविना असे प्रकार थांबणार नाहीत !