ताजमहाल नव्हे, तर हिंदूंचे शिवालय असलेले प्राचीन तेजोमहालयच !

ताजमहालचे खरे स्वरूप उघड करणारी लेखमाला !

ताजमहाल

सध्या ताजमहाल हे ‘तेजोमहालय’ असल्याचे अनेक हिंदुत्वनिष्ठ संघटना म्हणत आहेत, तर काही मुसलमान नेते आणि भारतातील तथाकथित धर्मनिरपेक्षतावादी जमात याच्या विरोधात थयथयाट करत आहे. ‘ताजमहाल’ ही वास्तू मुसलमानांची नसून मुळात ती हिंदूंची आहे. तेथे पूर्वी भगवान शिवाचे मंदिर होते. मुसलमान आक्रमकांनी त्या वास्तूला ‘ताजमहाल’ केले. ‘ताजमहाल’ हे पूर्वी ‘शिवालय’ होते’, असे अनेक पुरावे पुरातत्व विभागाचे अधिकारी, इतर पुरातत्वतज्ञ, इतिहासाचे अभ्यासक, तसेच देशविदेशांतील तज्ञ सांगतात. नुकतीच अलाहाबाद उच्च न्यायालयाच्या लखनौ खंडपिठामध्ये भाजपचे नेते डॉ. रजनीश सिंह यांनी ताजमहालविषयी एक याचिका अधिवक्ता रुद्र विक्रम सिंह यांच्या माध्यमातून प्रविष्ट केली आहे. या याचिकेत आगऱ्यातील ताजमहालच्या परिसरातील २० हून अधिक खोल्या उघडण्याचा आदेश देण्याची मागणी करण्यात आली आहे. त्या पार्श्वभूमीवर ही लेखमाला प्रसिद्ध करत आहोत.

१. मुसलमान आक्रमकांची विध्वंसक वृत्ती !

‘मुसलमान आक्रमणकर्त्यांनी भारतातील केवळ गाव आणि शहरे यांचीच नावे पालटली नाहीत, तर तेथील भव्य वास्तू कह्यात घेऊन अन् त्यांत हवे तसे पालट करून त्यांना सर्रास मुसलमान नावे दिली. मुळात मुसलमानांना एवढ्या भव्य आणि सुंदर वास्तू बनवण्याचे ज्ञानच अवगत नव्हते. हिंदूंनी मात्र अजिंठा, वेरूळ यांसह अनेक भव्य मंदिरे इस्लाम पंथाच्या स्थापनेपूर्वीच बांधली होती. मुसलमान आक्रमणकर्त्यांना केवळ भारतातील वास्तूकलेचे सुंदर नमुने उद्ध्वस्त करणे इतकेच ठाऊक होते. मुसलमान आक्रमकांच्या विध्वंसक वृत्तीला गझनीने अनेकदा उद्ध्वस्त केलेल्या श्री सोमनाथ मंदिरापासून ते अफगाणिस्तानात अलीकडेच उद्ध्वस्त केलेल्या बामयान येथील भव्य बुद्धमूर्तीपर्यंतचा इतिहास साक्षी आहे.

ताजमहालावरील कळसाच्या आकारातील कळस

२. इंग्रज शासकांकडूनही विध्वंसच !

मुसलमान आक्रमकांच्या नंतर आलेल्या इंग्रज शासकांना भारतीय संस्कृतीविषयी किंचितही प्रेम नसल्याने त्यांनी मुसलमान आक्रमणकर्त्यांचीच री ओढली.

३. आक्रमकांच्या रोजनिशीतील ताजमहालाविषयीचे सत्य !

आगरा येथील जगप्रसिद्ध ‘ताजमहाल’ या वास्तूचीही अशीच कहाणी आहे. डॉ. राधेश्याम ब्रह्मचारी यांनी ताजमहालचा तथाकथित निर्माता शाहजहान याच्याच कारकीर्दीतीत लिहिल्या गेलेल्या कागदपत्रांचा संदर्भ घेऊन ताजमहालचा इतिहास पडताळून पाहिला आहे. अकबराप्रमाणे शहाजहाननेही ‘बादशाहानामा’ नावाच्या बखरीत स्वत:चे चरित्र आणि कारकीर्दीचा इतिहास लिहून ठेवला होता. हा अरबी भाषेतील ‘बादशाहानामा’ अब्दुल हमीद लाहोरी याने लिहिला होता. तो ‘एशियाटिक सोसायटी ऑफ बेंगाल’ या ग्रंथालयात आजही उपलब्ध आहे. या ‘बादशाहानामा’च्या पृष्ठ क्रमांक ४०२ आणि ४०३ मधील भागांत ताजमहाल या वास्तूचा इतिहास दडला आहे. या भागाचे स्वैर भाषांतर पुढे दिले आहे.

‘‘शुक्रवार दिनांक १५ मास जमदिउलवल या दिवशी शहाजहान याची पत्नी मुमताझुल जामानि हिचे पार्थिव बुऱ्हाणपूर येथून आगरा (तेव्हाचे अकबराबाद) येथे आणण्यात आले. येथील राजा मानसिंह यांचा महाल म्हणून ओळखल्या जाणाऱ्या इमारतीत दफन करण्यात आले. ही इमारत राजा मानसिंह यांचे नातू राजा जयसिंह यांच्या मालकीची होती. त्यांनी ही इमारत शहाजहानला देण्याची स्वीकृती दर्शवली. त्या बदल्यात राजा जयसिंह यांना शरीफाबाद येथील जहागिरी देण्यात आली. येथे दफन केलेल्या महाराणीचे दर्शन जगाला होऊ नये, यासाठी या इमारतीचे दर्ग्यात रूपांतर करण्यात आले.’’

४. शिवालयाच्या पुराव्याला पुरातत्व शास्त्रज्ञांचाही दुजोरा !

अ. प्रख्यात पुरातत्वशास्त्रज्ञ डी.जे. काळे यांनीही वरील कागदपत्रास दुजोरा दिला आहे. त्यांच्या संशोधनाप्रमाणे ‘राजा परमार्दीदेव याने २ भव्य संगमरवरी मंदिरे बांधली. त्यातील एक श्रीविष्णूचे, तर दुसरे भगवान शिवाचे होते. कालांतराने मुसलमान आक्रमकांनी या मंदिरांचे पावित्र्य भंग केले. त्या घटनेला घाबरून एका व्यक्तीने ही कागदपत्रे भूमीत गाडून ठेवली असावी. या मंदिरांचे पावित्र्य भंग झाल्याने त्यांचा धार्मिक उपयोग बंद झाला. म्हणूनच ‘बादशाहानामा’चा लेखक अब्दुल हमीद लाहोरी याने ‘मंदिरा’ऐवजी ‘महाल’ असा उल्लेख केला असावा.’

आ. प्रसिद्ध इतिहासकार आर्.सी. मुजुमदार यांच्या मते चंद्रात्रेय (चंदेल) राजा परमार्दीदेव याचे दुसरे नाव परमळ होते आणि त्याच्या राज्याला बुंदेलखंड असे नाव होते. आज आगरा येथे दोन संगमरवरी प्रासाद आहेत. त्यातील एक नूरजहानच्या वडिलांची कबर (श्रीविष्णु मंदिर) आहे आणि दुसरा ताजमहाल (शिवमंदिर) आहे.

(क्रमशः)

(साभार : साप्ताहिक ‘ऑर्गनायझर’, २८.११.२००४)

—————————————————————————-

पुढील भाग https://sanatanprabhat.org/marathi/578940.html इथे वाचा.

संपादकीय भूमिका

परकीय आक्रमकांनी कह्यात घेतलेल्या हिंदूंच्या सर्व वास्तू हिंदूंना परत मिळण्यासाठी केंद्र सरकारने कायदा करावा !