हिंदु राजे आणि क्रांतीकारक यांच्याकडून प्रेरणा घेऊन हिंदु राष्ट्राच्या स्थापनेसाठी योगदान द्या ! – योगेश ठाकूर, हिंदु जनजागृती समिती

आद्य क्रांतीवीर वासुदेव बळवंत फडके यांच्या शिरढोण गावातील धर्मप्रेमींचा हिंदु राष्ट्र-जागृती सभेला उत्स्फूर्त प्रतिसाद !

श्री. योगेश ठाकूर

शिरढोण (पनवेल), २७ एप्रिल (वार्ता.) – धर्मनिरपेक्षतेच्या नावावर आज देशात अल्पसंख्यांकांचे तुष्टीकरण आणि बहुसंख्यांक हिंदूंवर अन्याय केला जात आहे. भारतासह जगभरात ‘जिहाद’ने उच्छाद मांडला असल्याने विश्वकल्याणासाठी भारत हिंदु राष्ट्रच होणे हाच एकमेव उपाय आहे. आज विश्वशांतीसाठी भारताकडे आणि सनातन हिंदु धर्माकडे संपूर्ण जग आशेने बघत आहे. छत्रपती शिवाजी महाराजांनी पाच पातशाह्यांना नमवून हिंदवी स्वराज्य स्थापन केले, त्याप्रमाणे आपणही आपले हिंदु राजे आणि क्रांतीकारक यांच्याकडून प्रेरणा घेऊन हिंदु राष्ट्राच्या स्थापनेसाठी योगदान देऊया, असे आवाहन हिंदु जनजागृती समितीचे श्री. योगेश ठाकूर यांनी केले. हिंदु जनजागृती समितीने शिरढोण येथील हनुमान मंदिर येथे २३ एप्रिल या दिवशी आयोजित केलेल्या हिंदु राष्ट्र-जागृती सभेत श्री. योगेश ठाकूर ‘हिंदु राष्ट्राची आवश्यकता आणि त्यासाठी करावयाच्या प्रयत्नांची दिशा’, या विषयावर मार्गदर्शन करतांना ते बोलत होते.

गावातील शेकडो धर्मप्रेमी या सभेला उपस्थित होते. सभेतून प्रेरणा घेऊन रायगड जिल्ह्यातील तारा आणि दिघाटी गावांतही अशी हिंदु राष्ट्र-जागृती सभा घेण्याची सिद्धता उपस्थित धर्मप्रेमींनी व्यक्त केली.

उपस्थित मान्यवर

शिरढोण गावचे सरपंच आणि आद्य क्रांतिकारक वासुदेव बळवंत फडके हायस्कूलचे अध्यक्ष श्री. पांडुरंग मुकादम, उपसरपंच सौ. मोनाली घरत आणि सौ. निकिता चौधरी, तसेच क्रांतिवीर महिला संघाच्या अध्यक्षा सौ. साधना वाजेकर