श्रीलंकेत १ किलो तांदूळ तब्बल ५०० रुपयांना, तर १ किलो साखरेसाठी मोजावे लागणार २९० रुपये !

आर्थिक दिवाळखोरीच्या उंबरठ्यावर असलेल्या श्रीलंकेमध्ये खाद्यपदार्थांच्या किमतींमध्ये प्रचंड मोठ्या प्रमाणात वाढ झाल्याने आधीच मेटाकुटीला आलेल्या जनतेचे आता कंबरडे मोडले आहे.

हिंदु जनजागृती समितीचे राष्ट्रीय मार्गदर्शक सद्गुरु डॉ. चारुदत्त पिंगळे यांनी अखिल भारतीय ब्राह्मण सभेचे राष्ट्रीय अध्यक्ष पंडित सुरेंदर शर्मा यांची घेतली भेट !

हिंदु जनजागृती समितीच्या वतीने उत्तर भारतात हिंदु राष्ट्र संपर्क अभियान अंतर्गत समितीचे राष्ट्रीय मार्गदर्शक सद्गुरु डॉ. चारुदत्त पिंगळे यांनी अखिल भारतीय ब्राह्मण सभेचे राष्ट्रीय अध्यक्ष पंडित सुरेंदर शर्मा यांची भेट घेतली.

विधान परिषदेतही राजभाषा विधेयकास एकमताने मान्यता !

यापुढे सरकारी अधिकार्‍यांना सामाजिक माध्यमांद्वारे कामाची माहिती देतांना ती मराठी भाषेतूनच देण्याची सूचना देण्यात आली आहे. त्यामुळे ‘व्हॉट्सॲप’, ‘ट्विटर’ आदी द्वारे कामाची माहिती देतांना अधिकार्‍यांना मराठीला डावलता येणार नाही.

विधानसभेत राजभाषा विधेयक एकमताने संमत !

सर्व सरकारी कार्यालयांमध्ये आता मराठीतूनच कामकाज होणार ! विधेयक संमत झाले हे कौतुकास्पद आहे; मात्र ‘त्याला विलंब का झाला ?’, असा प्रश्न मराठीप्रेमींना नक्कीच पडला आहे

होळी आणि रंगपंचमी यांमध्ये होणार्‍या अपप्रकारांच्या विरोधात हिंदु जनजागृती समितीचे मुझफ्फरपूर अन् हाजीपूर येथे जिल्हाधिकार्‍यांना निवेदन सादर

होळी आणि रंगपंचमी यांमध्ये होणारे अपप्रकार थांबवावे, यासाठी हिंदु जनजागृती समितीच्या वतीने मुझफ्फरपूर अन् हाजीपूर येथे जिल्हाधिकार्‍यांना निवेदन देण्यात आले.

राज्यात प्रशासन, पोलीस आणि वाळू माफिया यांची संगनमताने वाळू तस्करी चालू ! – विधानसभेत सर्वपक्षीय सदस्यांचा सरकारवर गंभीर आरोप 

या वेळी देवेंद्र फडणवीस म्हणाले की, प्रशासन आणि पोलीस यांच्याशी वाळू माफियांचे संगनमत असल्याविषयी मी पुढील अधिवेशनात २० पुरावे देतो. त्यामुळे या संदर्भात नवीन धोरण ठरवून वाळू तस्करीत सहभागी पोलीस अधीक्षकांना निलंबित करा.

ठेकेदार राष्ट्रीय महामार्गाची कामे करत नाहीत ! – अशोक चव्हाण, सार्वजनिक बांधकाममंत्री

२३ मार्च या दिवशी पुणे-बेंगळुरू राष्ट्रीय महामार्गाच्या कामाविषयीचा तारांकित प्रश्न आमदार अरुण लाड यांनी सभागृहात उपस्थित केला. यावर उत्तर देतांना चव्हाण यांनी वरील वक्तव्य केले. 

(म्हणे) ‘शालेय अभ्यासक्रमात ‘श्रीमद्भगवद्गीते’चा समावेश करणार नाही !’

‘श्रीमद्भगवद्गीता’ हा केवळ धार्मिक ग्रंथ नसून त्यात जीवनाचे सार आहे. त्यामुळे गीतेचा अभ्यास म्हणजे खर्‍या अर्थाने जीवनोद्धाराचा मार्ग आहे, हे शिक्षणमंत्री लक्षात घेतील का ?

मागील ११ वर्षांत २१९ मराठी शाळा बंद, तर ६९ सहस्र १०० विद्यार्थी घटले ! – प्रवीण दरेकर

पालकांनी पाल्यांना मराठी शाळांतून काढल्यामुळे विद्यार्थ्यांची संख्या घटली आणि शाळा बंद कराव्या लागल्या. विद्यार्थी संख्या घटल्यामुळे शिक्षकांची संख्या न्यून करावी लागली. याविषयी पालकांनी आत्मपरीक्षण करणे आवश्यक आहे.

महावितरण आस्थापनाचे भ्रष्ट अधिकारी सुमित कुमार यांना निलंबित करण्याचा ऊर्जामंत्री डॉ. नितीन राऊत यांचा आदेश !

सुमित कुमार यांच्याविरुद्ध भ्रष्टाचार, अधिकार्‍यांना धमकावणे आणि नैतिक अधःपतनाच्या गंभीर तक्रारी वरील आमदारांनी डॉ. नितीन राऊत यांच्या निदर्शनास आणून दिल्या. सुमित कुमार हे स्वतःच्या पदाचा दुरुपयोग करत अनधिकृतपणे पैशांची मागणी करतात.