हरिद्वार (उत्तराखंड) येथे होळी खेळणार्‍या हिंदूंवर धर्मांधांचे आक्रमण

हरिद्वार भारतात आहे कि पाकिस्तानात ? उत्तराखंडमध्ये भाजपचे सरकार असतांना अशा घटना घडू नयेत, असेच हिंदूंना वाटते !

नवी देहली – होळीच्या वेळी काही ठिकाणी हिंदूंवर धर्मांधांनी आक्रमणे करण्याच्या घटना घडल्याचे समोर आले आहे. उत्तराखंडच्या हरिद्वार येथील लालढांग परिसरामध्ये होळी साजरी करणार्‍या हिंदूंवर नमाजपठणासाठी आलेल्या धर्मांधांनी आक्रमण केले. या प्रकरणी नजर हसन अंसारी, अरबाज अंसारी, अब्दुल सलाम आणि मुस्तकीम यांच्या विरोधात गुन्हा नोंदवण्यात आला आहे.

नोएडा येथे नमाजपठणासाठी होळी खेळण्यास विरोध

उत्तरप्रदेशातील नोएडा येथे ईकोटेक-३ पोलीस ठाण्याच्या क्षेत्रात हिंदु तरुण होळी साजरी करत असतांना धर्मांधांनी नमाजपठणासाठी होळी खेळणे बंद करण्यास सांगितले. हिंदूंनी त्यास नकार दिला. त्यानंतर धर्मांधांनी पोलिसांकडे तक्रार केल्यावर पोलिसांनी हिंदूंनी लावलेला डीजे (संगीत यंत्रणा) जप्त केला. (अशा प्रकारची तक्रार केल्यावर पोलीस लगेच कारवाई करतात; मात्र हिंदूंनी मशिदींवर विनाअनुमती ध्वनीक्षेपक लावल्याची तक्रार केल्यावर पोलीस शेपूट घालतात, हे लक्षात घ्या ! – संपादक)