राजस्थानमधील शाळेतील शिक्षिकेने विद्यार्थ्यांना वाटले ‘हिंदुईजम् : धर्म या कलंक’ हे पुस्तक !

राजस्थानमध्ये हिंदुविरोधी काँग्रेसचे सरकार असल्यामुळे अशा हिंदुद्वेषी शिक्षिकेची चौकशी होऊन तिला शिक्षा होईल का ?, हा प्रश्‍नच आहे ! असे शिक्षक विद्यार्थ्यांसमोर कोणता आदर्श ठेवणार ?

परात्पर गुरु डॉ. आठवले यांचे तेजस्वी विचार

‘मायेतील शिक्षण तन-मन-धनाचा वापर करून पैसे मिळवायला शिकवते, तर साधना तन-मन-धनाचा त्याग करून ईश्वरप्राप्ती करायला शिकवते !’ – (परात्पर गुरु) डॉ. आठवले

कळंगुट येथील निवासस्थानी चालू असलेल्या अनधिकृत पशूवधगृहावर छापा

कळंगुट पोलिसांनी गौरावाडा, कळंगुट येथे रूडॉल्फ फर्नांडिस यांच्या निवासस्थानी चालू असलेल्या पशूवधगृहावर छापा टाकला आहे. या छाप्यात पोलिसांनी ७१ टिन कॅन (डबे) कॅटल फॅट, हाडे, हुक, गॅस बर्नर, शिंगे आणि हत्यारे कह्यात घेतली आहेत.

भाजपचे नेते गिरीश महाजन यांची विधानसभा अध्यक्ष आणि उपाध्यक्ष निवडीच्या विरोधात मुंबई उच्च न्यायालयात जनहित याचिका प्रविष्ट !

मुंबई उच्च न्यायालयाने ही याचिका ऐकण्यासाठी मुंबई उच्च न्यायालयाने १० लाख रुपये ‘डिपॉझिट’ भरावे अशी पूर्वअट ठेवली आहे.

कोल्हापूर येथील श्री महालक्ष्मीदेवी आणि श्री जोतिबा मंदिरांत लहान मुलांसहित महिलांना ओटीचे साहित्य घेऊन जाण्यास अनुमती ! – शिवराज नाईकवाडे, सचिव, पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समिती

राज्यशासनाने कोरोना संसर्गाचे असलेले निर्बंध मोठ्या प्रमाणात शिथिल केले आहेत.

महाशिवरात्रीच्या निमित्ताने मिरज येथील काशी विश्वेश्वर मंदिर येथे कीर्तन महोत्सव आणि आरोग्य शिबिर पार पडले !

समर्थभक्त श्री. माधवराव गाडगीळ मित्रपरिवार यांच्या वतीने महाशिवरात्रीच्या निमित्ताने २७, २८ फेब्रुवारी आणि १ मार्च या कालावधीत काशी विश्वेश्वर मंदिर येथे महाशिवरात्र कीर्तन महोत्सव आणि आरोग्य शिबिर पार पडले.

सत्ताधारी आणि विरोधक यांच्यातील राजकीय कुरघोडींमुळे विधीमंडळातील प्रश्नोत्तराच्या कामकाजाचा वेळ वाया !

जनतेचे प्रश्न सोडवण्यासाठी असलेला सभागृहाचा वेळ वाया घालवणे, ही लोकशाहीची शोकांतिकाच होय !

एस्.टी. महामंडळाचे शासनात विलीनीकरण अशक्य ! – त्रिसदस्यीय समितीची शिफारस

राज्य परिवहन महामंडळाचे राज्य सरकारमध्ये विलीनीकरण करणे शक्य नाही, अशी शिफारस या प्रकरणी नेमलेल्या त्रिसदस्यीय समितीने केली आहे. परिवहनमंत्री अनिल परब यांनी ४ मार्च या दिवशी विधानसभेत पटलावर हा अहवाल मांडला.

केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्यासह पुत्र नितेश राणे यांना न्यायालयाचा दिलासा

दिशा सालियन मृत्यू प्रकरणात वादग्रस्त विधान केल्यामुळे या दोघांवर गुन्हा नोंद करण्यात आला आहे. या प्रकरणाच्या सुनावणीत न्यायालयाने वरील निर्णय दिला आहे.