कोल्हापूर येथील श्री महालक्ष्मीदेवी आणि श्री जोतिबा मंदिरांत लहान मुलांसहित महिलांना ओटीचे साहित्य घेऊन जाण्यास अनुमती ! – शिवराज नाईकवाडे, सचिव, पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समिती

श्री महालक्ष्मीदेवीच्या मंदिरात ओटीचे साहित्य आत घेऊन जातांना महिला आणि शेजारी सचिव शिवराज नाईकवाडे (उजवीकडून दुसरे )

कोल्हापूर, ४ मार्च (वार्ता.) – राज्यशासनाने कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर असलेले निर्बंध मोठ्या प्रमाणात शिथिल केले आहेत. त्यामुळे आजपासून साडेतीन शक्तीपिठांपैकी एक असलेल्या श्री महालक्ष्मीदेवी आणि श्री जोतिबा मंदिरांत लहान मुलांना ‘ई-पास’द्वारे प्रवेश देण्यात येत आहे, तसेच महिलांना ओटीचे साहित्य मंदिरात घेऊन जाण्यास अनुमती देण्यात आली आहे.

श्री महालक्ष्मीदेवीच्या मंदिरात लहान मुलांना आत सोडतांना देवस्थानचे कर्मचारी

सध्या २ सहस्र भाविकांना थेट ई-पासद्वारे दर्शन देण्यात येत आहे. लवकरच २ सहस्र भाविकांना मुखदर्शन घेण्याची सोय देवस्थान करून देणार आहे, अशी माहिती ‘पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समिती’चे सचिव शिवराज नाईकवाडे यांनी ४ मार्च या दिवशी पत्रकार परिषदेत दिली.