सिंधुदुर्ग जिल्ह्यात कोरोनाचे ९१ नवीन रुग्ण

जिल्ह्यात कोरोनाचे ९१ नवीन रुग्ण आढळले, तर मृत्यू झाल्याची नोंद नाही. मृत्यू झालेल्या रुग्णांची एकूण संख्या १ सहस्र ४६५ झाली आहे.

बीड येथे एस्.टी. बस आणि ट्रक यांची धडक होऊन भीषण अपघात !

अपघात इतका भीषण होता की, बस आणि ट्रक यांचा चुराडा झाला असून बचावकार्यासाठी घटनास्थळी क्रेन बोलवण्यात आली होती. घायाळ झालेल्यांना उपचारासाठी रुग्णालयात भरती करण्यात आले आहे.

कर्नाटकात जाण्यासाठी आता ‘आर्.टी.पी.सी.आर्.निगेटिव्ह’ अहवालाची सक्ती !

जिल्हाधिकाऱ्यांनी ९ जानेवारी या दिवशी निपाणी जवळील कोगनोळीसह जिल्ह्यातील विविध आंतरराज्य सीमा चौक्यांना भेट देऊन पहाणी केली. या वेळी त्यांनी ‘असा अहवाल ज्या प्रवाशांकडे नसेल त्यांना प्रवेश देण्यात येऊ नये’, असे सांगितले.

‘हिंदु राष्ट्रा’साठी प्रयत्नांची पराकाष्ठा करा !

‘नष्ट करणे सोपे असते; पण घडवणे कठीण असते. असे असले, तरी आपल्याला प्रयत्नांची पराकाष्ठा करून साधक आणि हिंदु राष्ट्र यांना घडवायचे आहे.’ – (परात्पर गुरु) डॉ. आठवले  

तेलंगाणा आणि आंध्रप्रदेश या राज्यांमध्ये हिंदु जनजागृती समितीच्या ‘३१ डिसेंबर’विरोधी जनजागृती उपक्रमांना उत्स्फूर्त प्रतिसाद

‘३१ डिसेंबर’विरोधी जनजागृती ! समाजात जनजागृती करण्यासाठी समितीच्या वतीने तेलंगाणा आणि आंध्रप्रदेश या राज्यांमध्ये विविध उपक्रम राबवण्यात आले.

सनातनच्या ‘ज्ञानशक्ती प्रसार अभियाना’ला कोलकाताचे पू. संत स्वामी श्री कल्याणेश्वरजी महाराज यांचे आशीर्वाद

स्वामींना सनातनचे ग्रंथ भेट म्हणून देण्यात आले. त्यांनी काही ग्रंथ अतिशय उत्सुकतेने वाचले. यापूर्वीही स्वामीजींचे विविध कार्यासाठी आशीर्वाद मिळाले आहेत.

सनातन संस्थेच्या वतीने गरीब मुलांना सनातनच्या ‘संस्कार वह्या’ आणि ग्रंथ यांचे विनामूल्य वितरण

सनातन संस्थेच्या वतीने वेळोवेळी विविध समाजोपयोगी उपक्रम राबवले जातात.

…तर हिंदु धर्माविषयी चुकीची विधाने करणारे राहुल गांधी यांनाही अटक करावी लागेल ! – अधिवक्ता गौरव गोयल, सर्वोच्च न्यायालय

अभिव्यक्तीस्वातंत्र्य सर्वांना लागू व्हायला हवे; मात्र आपल्या देशात तसे होतांना दिसत नाही. हिंदु देवतांचा अपमान करणार्‍यांना एक न्याय आणि मोहनदास गांधींच्या विचारांशी असहमती दाखवणार्‍यांच्या विरोधात दुसरा न्याय, हा भेदभाव या देशात चालणार नाही.

कोरोनाच्या वाढत्या संसर्गामुळे राज्यात पुन्हा निर्बंध, रात्र संचारबंदीसह समारंभांवर बंधने !

कोरोनाच्या वाढत्या संसर्गाला रोखण्यासाठी ८ जानेवारीच्या मध्यरात्रीपासून राज्यात कडक निर्बंध लावण्यात आले आहेत.

आर्.टी.पी.सी.आर्. चाचणीत ८ पुरुषांची नोंद ‘महिला’ अशी केली, लहान मुलांचे वय १३० वर्षे नोंदवले !

चाचणीसाठी ५० जणांचे नमुने पाठवण्यात आले होते; मात्र त्यातील ९ ते १० वर्षांच्या १४ मुलांचे वय निष्काळजीपणे १३० वर्षे नोंदवण्यात आले आहेत.