कर्नाटकात जाण्यासाठी आता ‘आर्.टी.पी.सी.आर्.निगेटिव्ह’ अहवालाची सक्ती !

कोगनोळी टोल प्लाझा

बेळगाव (कर्नाटक), १० जानेवारी – कोरोना संसर्गाच्या वाढत्या प्रभावामुळे कर्नाटक राज्यात जाणार्‍यांसाठी आता कोरोना प्रतिबंधात्मक लसीचे दोन डोस घेतले असले तरीही कोरोनाच्या संदर्भातील ‘आर्.टी.पी.सी.आर्.निगेटिव्ह’ अहवालाची सक्ती करण्यात आली आहे.

या संदर्भात जिल्हाधिकारी एम्.जी. हिरेमठ यांनी ९ जानेवारी या दिवशी निपाणी जवळील कोगनोळीसह जिल्ह्यातील विविध आंतरराज्य सीमा चौक्यांना भेट देऊन पहाणी केली. या वेळी त्यांनी ‘असा अहवाल ज्या प्रवाशांकडे नसेल त्यांना प्रवेश देण्यात येऊ नये’, असे सांगितले.

आपत्कालीन काम आणि इतर कामे यांसाठी जे लोक शेजारच्या राज्यात गेले आहेत आणि ज्यांच्याकडे ‘आर्.टी.पी.सी.आर्.निगेटिव्ह’ अहवाल नाही त्यांची सीमेवरच ‘रॅपिड अँटिजेन’ चाचणी केल्यावरच त्यांना जिल्ह्यात प्रवेश करण्यास अनुमती देण्यात यावी’, अशा सूचना कर्मचार्‍यांना दिल्या आहेत.