सनातनच्या ‘ज्ञानशक्ती प्रसार अभियाना’ला कोलकाताचे पू. संत स्वामी श्री कल्याणेश्वरजी महाराज यांचे आशीर्वाद

पू. संत स्वामी श्री कल्याणेश्वरजी महाराज यांना ग्रंथभेट देतांना श्री. सियाराम साहा आणि सौ. तनुश्री साहा

कोलकाता – भवानीपूर येथील श्री श्री राधा गोविंद मंदिर आणि आश्रम येथे रहाणारे गौडिय संत स्वामी श्री कल्याणेश्वरजी महाराज यांची त्यांच्या जन्मोत्सवानिमित्त सनातन संस्थेचे साधक श्री. सियाराम साहा, सौ. तनुश्री साहा आणि ६२ टक्के आध्यात्मिक पातळीच्या आधुनिक वैद्या (कु.) श्रिया साहा यांनी भेट घेतली. याप्रसंगी त्यांनी पू. स्वामींना सनातनच्या ‘ज्ञानशक्ती प्रसार अभियाना’विषयी माहिती सांगितली आणि अभियानासाठी त्यांचे आशीर्वाद घेतले.

या वेळी स्वामींना सनातनचे ग्रंथ भेट म्हणून देण्यात आले. त्यांनी काही ग्रंथ अतिशय उत्सुकतेने वाचले. ते म्हणाले, ‘‘सनातनचे ग्रंथ आणि पाक्षिक ‘सनातन प्रभात’ मी आवडीने वाचतो.’’ यापूर्वीही स्वामीजींचे विविध कार्यासाठी आशीर्वाद मिळाले आहेत.