नागपूर पोलिसांनी श्रीनगरला जाऊन आतंकवादी तरुणाची चौकशी केली !

नेमक्या कुठल्या भागांची रेकी केली, या सर्व गोष्टींची माहिती घेण्यासाठी नागपूर गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस अधिकारी हे डिसेंबर २०२१ च्या शेवटी श्रीनगर येथे जाऊन आले आहेत.

रिक्षाचे देयक न दिल्याने चालकाने केला अल्पवयीन मुलीवर बलात्कार !

सामाजिक नैतिकता ढासळत चालल्याचे हे उदाहरण आहे. आरोपींना त्वरित आणि कठोरात कठोर शिक्षा व्हायला हवी.

पत्रकारदिनाच्या निमित्ताने ‘भुईंज प्रेस क्लब’च्या वतीने भृगुऋषि मठ आणि महालक्ष्मी मंदिर यांची स्वच्छता !

पत्रकारदिनाचे औचित्य साधत आणि आपला सांस्कृतिक वारसा जतन करणे, हे आपले आद्यकर्तव्य आहे. याची जाणीव ठेऊन ‘भुईंज प्रेस क्लब’च्या वतीने भृगुऋषि यांच्या पदस्पर्शाने पुनित झालेल्या आणि कृष्णातिरी असणार्‍या भृगुऋषि मठाची, तसेच श्री महालक्ष्मी मंदिराची स्वच्छता करण्यात आली.

अन्वेषणासाठी पुणे पोलिसांचे ५० जणांचे पथक जळगाव येथे आले !

पोलीस उपायुक्त सुषमा चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली पोलिसांची ५ पथके सिद्ध करण्यात आली असून या पथकाकडून स्वतंत्ररित्या चौकशी करण्यात येत आहे.

दैनिक ‘सनातन प्रभात’ प्रत्येक घरी पोचवण्यासाठी प्रयत्न करणे, ही समष्टी साधनाच आहे ! – सद्गुरु सत्यवान कदम

धर्मशिक्षणासह धर्मरक्षणासाठी हिंदूंमध्ये जागृती कशी करावी ? धर्मद्रोही विचारांचे खंडण कसे करावे ? राष्ट्र आणि धर्म यांच्या रक्षणासाठी वैध मार्गाने आपण काय प्रयत्न करू शकतो ? आदी गोष्टींविषयी दैनिक ‘सनातन प्रभात’मधून दिशादर्शन करण्यात येते.

मुंबईतील केंद्रीय अन्वेषण यंत्रणेच्या कार्यालयात ६८ कर्मचारी कोरोनाबाधित !

७ जानेवारी या एकाच दिवशी मुंबईतील ९३ पोलीस कर्मचार्‍यांना कोरोनाची लागण झाल्याचे आढळून आले. सध्या कोरोनाबाधित ४०९ पोलिसांवर उपचार चालू आहेत. गेल्या ४८ घंट्यात २ कोरोनाबाधित पोलिसांचा मृत्यू झाला आहे.

लोकांची गर्दी होत असेल, तर मद्याची दुकानेही बंद करावी लागतील ! – राजेश टोपे, आरोग्यमंत्री

राज्यात कोरोनाच्या रुग्णांत झपाट्याने वाढ होत असल्याने नवीन निर्बंध लागू करण्यात आले आहेत.

मुंबई येथे महापालिकेच्या कोविड केंद्रात ८० टक्के खाटा रिक्त, तर खासगी रुग्णालयांत रुग्णांची गर्दी !

खासगी रुग्णालयांनी स्वतःचे ८० टक्के बेड हे कोरोनाच्या रुग्णांसाठी उपलब्ध करून द्यावेत आणि कोणत्याही प्रकारचे अतिरिक्त शुल्क आकारण्यात येऊ नये, अशा कडक सूचना महानगरपालिकेने दिल्या आहेत

सातारा औद्योगिक वसाहतीमध्ये १४ कोटी रुपयांचा घोटाळा !

पुणे येथील १८ रहिवाशांनी सातारा येथील औद्योगिक वसाहतीमध्ये १३ कोटी ६४ लाख ७१ सहस्र ८७६ रुपयांच्या चोरीसह भ्रष्टाचार केला होता.