६ जणांचा जागीच मृत्यू, तर ८ जण गंभीर घायाळ

बीड – येथे ९ जानेवारी या दिवशी एस्.टी. बस आणि ट्रक यांची धडक होऊन भीषण अपघात झाला. लातूर-अंबाजोगाई रस्त्यावर बस आणि ट्रक यांची धडक झाली. या धडकेत ६ जणांचा जागीच मृत्यू झाला आहे, तर ८ जण गंभीर घायाळ झाले आहेत. अपघात इतका भीषण होता की, बस आणि ट्रक यांचा चुराडा झाला असून बचावकार्यासाठी घटनास्थळी क्रेन बोलवण्यात आली होती. घायाळ झालेल्यांना उपचारासाठी रुग्णालयात भरती करण्यात आले आहे.
(सौजन्य : महाराष्ट्र टाइम्स)
या अपघाताची माहिती मिळताचा स्थानिक ग्रामस्थांनी साहाय्यासाठी घटनास्थळी धाव घेतली. अपघातामुळे या मार्गावर वाहतूक कोंडी होऊन रस्त्याच्या दोन्ही बाजुंना वाहनांच्या रांगाच रांगा लागल्या होत्या.
सध्या ‘एआय’ कॅमेर्यावरून दंड आकारणार नाही
१ ऑगस्टपासून ‘म्हाजी बस योजना’ संपूर्ण गोव्यात लागू होणार
राज्यातील ६ शासकीय वैद्यकीय रुग्णालयांच्या जवळ उभारण्यात येणार सुसज्ज धर्मशाळा !
आषाढी वारीसाठी पंढरपूर येथे जाण्यासाठी पुणे विभागातून ३५० अधिकच्या गाड्या !
पंढरपूर येथे यात्रेसाठी उभारलेला तात्पुरता मंडप कोसळला !
महाविद्यालयीन तरुणीवर वर्षभर अत्याचार करणार्या ४ मुसलमान तरुणांना अटक !