माणगाव (जिल्हा सिंधुदुर्ग) येथील लेफ्टनंट कमांडर सूरज वारंग ‘नौसेना अध्यक्ष प्रशंसा पदका’ने सन्मानित

नौदलातील ‘एम्.आय.जी. २९ के’ या विमानाच्या देखभाल-दुरुस्तीची सुविधा भारतात नव्हती. ते रशियाकडून करून घेतले जात होते. विमानांसाठी सर्व सुविधा भारतात निर्माण करण्याविषयी लेफ्टनंट कमांडर सूरज यांनी प्रयत्न केला आणि त्यात ते यशस्वी झाले !

सौदी अरेबियात ‘तबलिगी जमात’ संघटनेवर बंदी !

मुसलमानांसाठी अत्यंत महत्त्वाचा देश असलेला सौदी अरेबियाला जर ‘तबलिगी जमात ही संघटना आतंकवादाचा प्रवेशद्वार आहे’, वाटते आणि तो देश तिच्यावर बंदी घालतो, तर भारत का बंदी घालण्यास कचरतो ? सौदी अरेबियाच्या पावलावर पाऊल टाकून भारत अशी कारवाई कधी करणार ?

पाट ते पिंगुळी रस्त्याच्या कामाकडे प्रशासनाचे दुर्लक्ष : ग्रामस्थांनी पालकमंत्री उदय सांमत यांच्या वाहनांचा ताफा अडवला

पालकमंत्र्यांनी संबंधित ठेकेदार आणि बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांशी संपर्क केला अन् ‘येत्या १० दिवसांत रस्त्याच्या कामाला प्रारंभ केला जाईल’, असे आश्‍वासन दिले.

शेर्ले येथील श्री रवळनाथ मंदिरातील दानपेटी फोडून रोख रकमेची चोरी

हिंदूंची असुरक्षित मंदिरे ! सावंतवाडी तालुक्यातील शेर्ले गावातील श्री रवळनाथ मंदिरातील दानपेटी अज्ञात चोराने फोडून त्याताल रोख रक्कम चोरली.

जहाजावरून आलेल्या ४ विदेशी नागरिकांना ‘ओमिक्रॉन’चा संसर्ग झाला नसल्याचे उघड

इंग्लंड येथून विमानाने गोव्यात आलेले अन्य ३ विदेशी नागरिकही कोरोनाबाधित झाले आहेत आणि त्यांचे कोरोनाविषयक चाचणीचे नमुने ‘जिनोमी सिक्वेन्सिंग’साठी पुणे येथील प्रयोगशाळेत पाठवण्यात आले आहेत.

(म्हणे) ‘सत्तेवर आल्यास ‘गृहलक्ष्मी’ योजना चालू करून कुटुंबप्रमुख महिलेला प्रतिमास ५ सहस्र रुपये अर्थसाहाय्य देणार !’

महिलांना स्वावलंबी, स्वाभिमानी आणि सक्षम न बनवता त्यांना आमिषे दाखवून कमकुवत बनवणारे राजकीय पक्ष !

परात्पर गुरु डॉ. आठवले यांचे तेजस्वी विचार

‘प्रजा सात्त्विक असली, तरच लोकशाहीला अर्थ असतो. प्रजा हल्लीसारखी स्वार्थी, तसेच राष्ट्र आणि धर्म यांच्या संदर्भात निष्क्रीय असली, तर लोकशाही कशी असते, याचे भारत हे जगातील एकमेव केविलवाणे उदाहरण आहे !’

जयपूर, राजस्थान येथील धर्माभिमानी आणि शिवभक्त श्री. वीरेंद्र सोनी (वय ८६ वर्षे) संतपदी विराजमान !

येथील धर्माभिमानी आणि शिवभक्त श्री. वीरेंद्र सोनी (वय ८६ वर्षे) हे संतपदी विराजमान झाल्याचे श्रीचित्‌‌शक्ति (सौ.) अंजली गाडगीळ यांनी ३० नोव्हेंबर २०२१ या दिवशी घोषित केले.

टाटा मोटर्सचे माजी व्यवस्थापकीय संचालक प्रकाश तेलंग यांचे निधन !

टाटा मोटर्सचे माजी व्यवस्थापकीय संचालक प्रकाश तेलंग यांचे ८ डिसेंबर या दिवशी निधन झाले. तेलंग यांनी ३ दशके टाटा मोटर्समध्ये सेवा केली आहे. ते वर्ष २०१२ मध्ये निवृत्त झाले होते.