सागर (मध्यप्रदेश) येथील ‘सेंट फ्रांसिस सेवाधाम आश्रमा’त दोघा अल्पवयीन मुलांना बलपूर्वक गोमांस खाऊ घातले आणि बायबल वाचायला लावले !

राष्ट्रीय बाल अधिकार संरक्षण आयोगाकडून पोलीस अधीक्षकांना नोटीस बजावून कारवाईचा आदेश  

ख्रिस्त्यांच्या शाळा, महाविद्यालये, अनाथालये आणि आता आश्रम येथे असे प्रकार घडत असतात; मात्र पोलीस अन् प्रशासन त्याकडे नेहमीच दुर्लक्ष करतात. अशा घटना रोखण्यासाठी हिंदु राष्ट्रच हवे ! – संपादक

सागर (मध्यप्रदेश) – येथील श्यामपुरा भागातील ‘सेंट फ्रांसिस सेवाधाम आश्रमा’तील दोघा अल्पवयीन मुलांना बलपूर्वक गोमांस खाऊ घातल्याची, बायबल वाचायला लावल्याची आणि असे न केल्याने मुलांवर अत्याचार केल्याची घटना समोर आली आहे. या प्रकरणी ‘राष्ट्रीय बाल अधिकार संरक्षण आयोगा’ने सागर जिल्ह्याच्या पोलीस अधीक्षकांना नोटीस बजावून २ दिवसांत उत्तर देण्यास आणि कारवाई करण्यास सांगितले आहे. ख्रिस्त्यांच्या या आश्रमात गेल्या दीड वर्षांपासून एक भाऊ आणि बहीण रहात होते. त्यांच्या संदर्भात ही घटना घडल्याने त्यांनी त्यांच्या वडिलांच्या माध्यमातून पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवली आहे.