‘भगव्या आतंकवादा’च्या नावाखाली मला अडकवण्यासाठी तत्कालीन काँग्रेस सरकारने ४०० कोटी रुपये व्यय केले ! – रा.स्व. संघाचे नेते इंद्रेश कुमार

रा.स्व. संघाचे नेते इंद्रेश कुमार

नवी देहली – काँग्रेसप्रणीत आघाडी सरकारने त्याच्या काळात ‘भगव्या  आंतकवादा’च्या नावाखाली मला अडकवण्याचे पुष्कळ प्रयत्न केले. यासाठी ४०० कोटी रुपये व्यय करण्यात ओल. पूर्ण यंत्रणा कामाला लावली गेली; मात्र आरोपींच्या सूचीमध्ये माझे नाव घालण्यात त्यांना यश आले नाही. माझे नाव साक्षीदारांच्या सूचीमध्येही समाविष्ट करण्यात आले नव्हते; मात्र या प्रकरणात मी सहभागी असल्याचा मोठा गवगवा करण्यात आला होता. अंततः जनतेनेच या आघाडी सरकारला बाहेरचा रस्ता दाखवला आणि भाजपला मोठा पाठिंबा दर्शवला, असे विधान रा.स्व. संघाचे नेते इंद्रेश कुमार यांनी केले.

इंद्रेश कुमार यांनी यापूर्वी जम्मू-काश्मीरविषयी बोलतांना म्हटले होते की, पाकिस्तान जर म्हणत असेल की, काश्मीरविना तो अपूर्ण आहे, तर मग ‘लाहोर आणि कराची यांच्याविना भारतही अपूर्ण आहे’, असे आता म्हणायला हवे.