‘सिख फॉर जस्टिस’ या खलिस्तानी आतंकवादी संघटनेने प्रकाशित केले खलिस्तानी राष्ट्राचे मानचित्र !

पंजाबसह हरियाणा, हिमाचल प्रदेश, उत्तरप्रदेश आणि राजस्थान राज्यांतील अनेक जिल्ह्यांचा समावेश

आतंकवादी गुरपतवंत सिंह पन्नू

वॉशिंग्टन (अमेरिका) – अमेरिकेतील ‘सिख फॉर जस्टिस’ नावाच्या बंदी घालण्यात आलेल्या खलिस्तानवादी संघटनेने खलिस्तानी राष्ट्राचे मानचित्र (नकाशा) प्रकाशित केले आहे. यात पंजाबच नव्हे, तर हरियाणा, हिमाचल प्रदेश, उत्तरप्रदेश आणि राजस्थान या राज्यांतील अनेक जिल्हे खलिस्तानचा भाग असल्याचे दाखवण्यात आले आहे. या संघटनेचा प्रमुख आतंकवादी गुरपतवंत सिंह पन्नू आहे. ‘खलिस्तान’ बनवण्याच्या मागणीसाठी वर्ष २०१९ मध्ये ‘पंजाब स्वतंत्रता जनमत संग्रह अभियान’ चालू केल्यानंतर या संघटनेवर भारताने बंदी घातली होती. मानचित्र प्रकाशित करून या संघटनेने दावा केला आहे की, लवकरच भारताच्या या भागावर नियंत्रण मिळवून खलिस्तान निर्माण केले जाईल.