प्रशासनाने हानीभरपाई देण्याचे आश्वासन दिल्यानंतर कळणे ग्रामस्थांचे आंदोलन स्थगित
कळणे येथील खाण प्रकल्पाचा बंधारा जुलै मासात झालेल्या अतीवृष्टीत फुटून खाणीतील खनिजयुक्त पाणी येथील घरे आणि बागायती यांमध्ये घुसले होते. झालेल्या हानीची भरपाई मिळावी, यासाठी कळणे ग्रामस्थांनी १३ ऑक्टोबर या दिवशी आंदोलन चालू केले.