महाराष्ट्राला २ सहस्र ५०० मेगावॅट विजेची तूट, नोव्हेंबरपर्यंत अशीच स्थिती रहाण्याची शक्यता ! – डॉ. नितीन राऊत, ऊर्जामंत्री

डॉ. नितीन राऊत म्हणाले, ‘‘कोळशाच्या टंचाईमुळे राज्यातील वीजनिर्मिती न्यून झाली आहे. आवश्यकतेनुसार खुल्या बाजारातून महागड्या दरात वीज खरेदी करून विजेची आवश्यकता भागवली जात आहे.

हेडगेवार हायस्कूलचे विद्यार्थी आणि पालक यांची प्रत्यक्ष परीक्षा आणि वर्ग चालू करण्याची मागणी !

विद्यार्थ्यांच्या परीक्षा आणि प्रत्यक्ष (ऑफलाईन ) वर्ग चालू करण्यात यावेत, अशी मागणी करत पणजी येथील हेडगेवार हायस्कूलचे विद्यार्थी, शिक्षक आणि पालक यांनी आझाद मैदानात मोर्चा काढला.

पाकिस्तान्यांकडून मुंबई पोलिसांचा ई-मेल ‘हॅक’ !

हा मेल अन्य शासकीय खात्यांसमवेतच नागरिकांनाही पाठवण्याची शक्यता आहे. या माध्यमातून भारतियांची माहिती मिळवण्याचा पाकिस्तान्यांचा प्रयत्न आहे. हा मेल उघडल्यास हॅकर्सना संबंधित ई-मेल आणि यंत्रणा यांचा ‘पासवर्ड’ मिळतो.

मडगाव येथील हॉस्पिसियो रुग्णालयातील रुग्णांना दक्षिण गोवा जिल्हा रुग्णालयात हालवण्याचा प्रशासनाचा निर्णय

जिल्हा रुग्णालय चालू झाल्यापासून आता तिसर्‍यांदा हॉस्पिसियो रुग्णालयातील विभाग जिल्हा रुग्णालयात स्थलांतरित करण्यात येणार आहेत. यापूर्वी २ वेळा हॉस्पिसियो रुग्णालयातील काही विभाग जिल्हा रुग्णालयात स्थलांतरित करण्यात आले होते;

माजी खासदार नीलेश राणे यांच्या पराभवाची ‘हॅट्रीक’ करण्यासाठी शिवसैनिक सज्ज ! – हरि खोबरेकर, शिवसेना तालुकाप्रमुख, मालवण

भाजपचे माजी खासदार राणे यांचा शिवसेनेचे विद्यमान खासदार विनायक राऊत यांनी सलग २ वेळा रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघात पराभव केला आहे.

दसर्‍यानिमित्त खंडोबाच्या जेजुरी गडाला संपूर्ण विद्युत् रोषणाई !

महाराष्ट्राच्या खंडोबा भक्तांचे श्रद्धास्थान असणार्‍या जेजुरीचा दसरा उत्सव म्हणजे ‘मर्दानी दसरा’ मानला जातो. कोरोना महामारीच्या पार्श्वभूमीवर शासकीय नियमांचे काटेकोर पालन करत गडकोटामध्ये प्रतिदिन मुख्य मंदिरात धार्मिक कार्यक्रम आणि नित्यपूजा होत आहे.

महाराष्ट्रातून बेळगाव जिल्ह्यात जातांना ‘आर्.टी.पी.सी.आर्.’ चाचणी आता बंधनकारक नाही !

कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर गेले काही मास महाराष्ट्रातून बेळगाव जिल्ह्यात (कर्नाटक) प्रवेश करतांना ‘आर्.टी.पी.सी.आर्.’ चाचणी बंधनकारक करण्यात आली होती. १४ ऑक्टोबरपासून ‘आर्.टी.पी.सी.आर्.’ चाचणीचे बंधन काढून टाकण्यात आले आहे.

पुणे येथे १४ वर्षीय मुलीची कोयत्याने वार करून निर्घृण हत्या !

महिलांसमवेत अल्पवयीन मुली असुरक्षित असणे छत्रपती शिवाजी महाराजांच्या महाराष्ट्रासाठी अशोभनीय ! कायदा-सुव्यवस्थेचा धाक निर्माण करण्यासमवेत समाजाला धर्मशिक्षण देऊन समाजाची सात्त्विकता आणि नीतीमत्ता वाढवणे आवश्यक आहे !

होय, हिंदु जागा होत आहे !

सध्या मध्यप्रदेश राज्यात नवरात्रोत्सवात अहिंदूंना करण्यात आलेल्या प्रवेशबंदीचा विषय चांगलाच गाजतो आहे. अहिंदूंच्या प्रवेशबंदीसाठी हिंदुत्वनिष्ठ संघटना पुढाकार घेऊन धर्महानी रोखण्यासाठी कृतीशील झाल्या आहेत. रतलाम येथे विश्व हिंदु परिषदेने श्री दुर्गापूजेच्या मंडपांमध्ये, तसेच अन्य धार्मिक कार्यक्रमांमध्ये अन्य धर्मियांच्या प्रवेशावर बंदी घातली आहे.

काश्मीरमधील हिंदूंवरील आक्रमणाविरोधात निषेध फेरी !

गेल्या आठवड्यात काश्मीरमध्ये हिंदु बांधवांवर आक्रमण करण्यात आले. यामुळे संपूर्ण हिंदु समाजात असंतोष निर्माण झाला आहे. आपल्या भारतभूमीमध्ये आपण परकियांसारखे रहातो, अशी परिस्थिती निर्माण झाली आहे.