महिला बालकल्याण सभापतीपदी भाजपच्या गीतांजली ढोपे-पाटील, तर समाजकल्याण सभापतीपदी सुब्राव मद्रासी बिनविरोध !

गीतांजली ढोपे-पाटील

सांगली, १३ ऑक्टोबर (वार्ता.) – सांगली, मिरज आणि कुपवाड महापालिकेच्या १२ ऑक्टोबर या दिवशी झालेल्या महिला आणि बालकल्याण सभापतीपदी भाजपच्या गीतांजली ढोपे-पाटील, तर समाजकल्याण सभापतीपदी सुब्राव मद्रासी यांची बिनविरोध निवड करण्यात आली.

सुब्राव मद्रासी

महिला आणि बालकल्याण समितीमध्ये १६ सदस्या असून निवडणुकीत भाजपच्या ढोपे-पाटील यांना ८ आणि काँग्रेसच्या शुभांगी साळुंखे यांनाही ८ मते मिळाली. समसमान मते पडल्याने चिठ्ठ्या टाकण्यात आल्या. यात भाजपच्या गीतांजली ढोपे-पाटील यांचे नाव आल्याने त्यांना विजयी घोषित करण्यात आले. पीठासीन अधिकारी म्हणून जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी यांनी काम पाहिले. या वेळी सांगली, मिरज आणि कुपवाड महपालिका आयुक्त नितीन कापडणीस, उपायुक्त राहुल रोकडे, उपायुक्त चंद्रकांत आडके उपस्थित होते.