पुण्यातील डी.एस्. कुलकर्णी यांच्या ‘ईडी’च्या कह्यातील बंगल्यात ७ लाखांची चोरी !

डी.एस्. कुलकर्णी

पुणे – सेनापती बापट रस्त्यावरील डी.एस्. कुलकर्णी यांच्या ‘ईडी’ने (अंमलबजावणी संचालनालय) कह्यात घेतलेल्या बंगल्यातून अनुमाने ७ लाखांचा मुद्देमाल चोरीला गेला आहे. या प्रकरणी भाग्यश्री कुलकर्णी यांनी चतु:श्रृंगी पोलीस ठाण्यात घरफोडीचा गुन्हा नोंद केला आहे. ही घटना ऑक्टोबर २०१९ ते ऑक्टोबर २०२१ या कालावधीत घडली आहे.

डी.एस्. कुलकर्णी यांनी ठेवीदारांचे पैसे न दिल्याच्या आरोपावरून त्यांच्यावर गुन्हा नोंद करण्यात आला आहे. त्यानंतर ‘ईडी’ने हा बंगला कह्यात घेतला होता. तेव्हापासून हा बंगला बंद आहे. तक्रारदार यांना या बंगल्यात चोरी झाल्याचा संशय आला. तेव्हा त्यांनी पोलीस अधिकारी आणि पंचांसमक्ष जाऊन बंगल्याची पहाणी केली. त्या वेळी बंगल्यातून टीव्ही, संगणक, कॅमेरा, एल्.ई.डी., गिझर, देवघरातील चांदीच्या वस्तू असा ६ लाख ९५ सहस्र रुपयांचा ऐवज चोरला असल्याचे निदर्शनास आले.