मराठवाडा येथे अतीवृष्टीमुळे २० लाख हेक्टर शेतीची हानी !
पिकांच्या हानीमुळे शेतकर्यांसमोर मोठे संकट, घरांचीही पडझड ! अतीवृष्टीमुळे अनेक रस्त्यांची वाहतूक बंद ! यवतमाळ येथे पुराच्या पाण्यात एस्.टी. बस वाहून ४ प्रवाशांचा मृत्यू ! बुलढाणा येथे पैनगंगा नदीच्या पुरात दोघे वाहून गेले !