परिवहनमंत्री अनिल परब यांची अंमलबजावणी संचालनालयाकडून ८ घंटे चौकशी करण्यात आली !

मुंबई – परिवहनमंत्री अनिल परब यांची अंमलबजावणी संचालनालयाकडून २८ सप्टेंबर या दिवशी ८ घंटे चौकशी करण्यात आली. चौकशीनंतर प्रसिद्धीमाध्यमांच्या प्रतिनिधींशी बोलतांना अनिल परब म्हणाले, ‘‘अंमलबजावणी संचालनालयाकडून विचारलेल्या सर्व प्रश्नांना मी उत्तरे दिली आहेत. मी कुणाला व्यक्तीगत उत्तरे देण्यास बांधील नाही.’’ या वेळी नेमक्या कोणत्या कारणास्तव अंमलबजावणी संचालनालयाकडून नोटीस देण्यात आली, याविषयी माहिती देण्यास परब यांनी टाळले.